Bride / Groom Form

महाराष्ट्र तेली महासंघाच्या प्रदेश कार्यकारिणीची मंगळवारी नांदेडात आढावा बैठक

27 September 2021 Teli samaj 80 views

    अर्धापूर - प्रदेश तेली महासंघाची नांदेड विभागातील आढावा बैठक मंगळवार, दि. २८ रोजी दु. १२ वा. हॉटेल विसावा पॅलेस शिवाजीनगर नांदेड येथे आयोजित करण्यात आली आहे. या बैठकीत तेली महासंघाच्या पदाधिकाऱ्यांनी उपस्थित राहावे, असे आवाहन करण्यात आले आहे.

     या बैठकीस अखिल भारतीय तैलिक साहू महासभेचे राष्ट्रीय अध्यक्ष माजी मंत्री जयदत्तअण्णा क्षीरसागर, तेली महासंघाचे प्रदेशाध्यक्ष विजय चौधरी, कार्याध्यक्ष माजी खा. सुरेश वाघमारे, विक्रांत चांडवडकर, तेली महासंघाच्या महिला आघाडी प्रदेशाध्यक्षा सौ. संध्याताई सव्वालाखे, उद्योजक मनोहर सिनगारे, माजी आ. शिवाजीराव चौथे, प्रदेश महासचिव ज्ञानेश्वर दुर्गंडे, अॅड.अभिषेक भगत, रेल्वे सल्लागार समितीचे सदस्य दिलीप सोनटक्के, संजय सिनगारे आदी मान्यवर उपस्थित राहन मार्गदर्शन करणार आहेत. या बैठकीत नांदेड जिल्ह्यातील तेली महासंघाच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन प्रदेश उपाध्यक्ष अॅड. बालाजीराव बनसोडे, अशोकराव बिजवे, दीपकराव सोनटक्के, इं. गजेंद्र साखरे, प्रकाश व्यंकटपूरवार, नागनाथ चिटकूलवार, पत्रकार सखाराम क्षीरसागर, ईश्वर पिन्नलवार, गिरीश बेंद्रे, कृष्णा तिम्मापुरे, भास्कर डोईबळे, मधुकर क्षीरसागर, बबनराव बनसोडे, गणेश उकरंडे, नंदकिशोर झोळगे, प्रकाश काळे, भगवान सोळंके, जिजाबाई तगडपल्ले, सौ. सिमा मुळावकर यांनी केले आहे.

Share:

📺 संबंधित व्हिडिओ:

▶️
Click to load video
YouTube Thumbnail

नामदेवे रचिला पाया तुका झालासे कळस … शाहिर संभाजी भगत