वधु - वर फॉर्म

खान्देश तेली समाज मंडळ जामनेर कार्यकारिणीची बैठक संपन्न

30 September 2021 Teli samaj 71 views

     खान्देश तेली समाज मंडळ जामनेर तालुका कार्यकारिणीची बैठक तालुका अध्यक्ष अजय अशोक चौधरी यांचे अध्यक्षतेखाली चौधरी कुशन रेग्झीन हाऊस याठिकाणी संपन्न झाली. यावेळेस मंडळाचे मुख्य सचिव रवींद्र जयराम चौधरी, कार्याध्यक्ष मनोज मधुकर चौधरी, उपाध्यक्ष भाऊसाहेब दौलत चौधरी,चंद्रकांत श्रीराम चौधरी, ललित रवींद्र चौधरी यांची विशेष उपस्थिती होती.

Khandesh Teli Samaj Mandal Jamner karyakarini meeting      बैठकीच्या सुरुवातीस रवींद्र चौधरी यांच्या हस्ते संताजी जगनाडे महाराज यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करण्यात आला.यावेळी त्त्यांनी मार्गदर्शन केले.त्यानंतर  सर्व पदाधिकारी यांचा परिचय करून घेण्यात आला. यावेळी सर्व नवनियुक्त पदाधिकाऱ्यांना नियुक्ती पत्र वाटप करण्यात आले अध्यक्ष अजय अशोक चौधरी, उपाध्यक्ष विशाल हरिश्चंद्र चौधरी, सचिव विलास शालीकराम चौधरी, कार्याध्यक्ष चैतन्य समाधान चौधरी,प्रसिद्धीप्रमुख सोपान नाना चौधरी, शहर अध्यक्ष निलेश रमेश चौधरी,शहर उपाध्यक्ष अमोल युवराज चौधरी, सल्लागार सारंग गोविंद चौधरी यांना नियुक्तीपत्र देण्यात आले. यावेळी पंचायत समितीचे सदस्य रमण तुकाराम चौधरी, सोसायटीचे चेअरमन संजय जगन्नाथ चौधरी, युवराज तुळशीराम चौधरी आदी मान्यवर उपस्थित होते.

शेयर करा:

📺 संबंधित व्हिडिओ:

▶️
Click to load video
YouTube Thumbnail

Amravati Teli Samaj Gunvant Vidyarthi Satkar