पाम तेलाचा तडका नकोच, तळणाला हवे घाण्याचे तेल
आहारतज्ज्ञांची माहिती : तेल चांगले तर आरोग्य चांगले
सध्या सणवारांचे दिवस आहेत, त्यामुळे घराघरांत तळण केले जाते. पण,गृहिणी तळण करताना चांगले तेल वापरत नसतील, तर ते आरोग्यासाठी धोकादायक ठरू शकते. त्यामुळे शक्यतो तळण्यासाठी फिल्टर्ड तेलाचा वापर करावा, त्यातही शेंगदाणा किंवा घाण्याचे तेल वापरले तर ते अतिशय चांगले ठरू शकेल, असे आहारतज्ज्ञांनी माहिती दिली.
आपण दररोज जे जेवण खातो, त्यात तेल चांगले वापरले तर आपले आरोग्यदेखील चांगले राहण्यास मदत होते. पण, तेल योग्य नसेल, तर मात्र आजारांना निमंत्रण देण्यासारखे ठरते. घरगुती खाद्यपदार्थांमध्ये अनेक तेल बियांपासून व धान्यापासून तयार केलेले तेल वापरले जाते. त्यात शेंगदाणा, करडई,नारळाचे, सोयाबीन, राइसब्रेन, पामतेल, आदींचा समावेश होतो. पण, आपली संस्कृती मात्र लाकडी घाण्यावर बनविलेल्या तेल खाण्याची आहे. त्यामुळे शक्यतो सर्वांनी घाण्यावरील तेल वापरणे गरजेचे आहे.
रिफाइंड तेलाने वाढतो वात
1) घाण्याचे तेल शुद्ध आणि नैसर्गिक खनिजे असतात. त्यामुळे शरीराला फायदा होतो. हे तेल वापरणे परवडत नाही म्हणून अनेकजण इतर तेल वापरतात. घाण्याच्या तेलाने प्रतिकारशक्ती वाढते. ते अपायकारक शरीराला नसते.
2) आयुर्वेदानुसार रिफाइंड तेल शरीरातील उवात वाढविते. त्यामुळे अनेकांना त्रास होऊ शकतो. लठ्ठपणा, गुडघ्यांचे विकार, मणक्याचे विकार त्याने वाढतात.
अॅल्युमिनियम कढई वापरावी
तळणासाठी वापरलेले तेल परत परत वापरूनये. शक्यतो अनेकजण लोखंडी कढई वापरतात, त्याऐवजी तळणासाठी अॅल्युमिनियमची कढई वापरावी. - डॉ. तेजस लिमये, आहारतज्ज्ञ
