खान्देश तेली समाज मंडळ शहादा शहर कार्यकारणी घोषित
खान्देश तेली समाज मंडळ शहादा शहराध्यक्ष श्री उदय दगा चौधरी यांचे शिफारशीवरून मंडळाचे अध्यक्ष कैलास आधार चौधरी यांच्या आदेशाने मंडळाचे मुख्य सचिव श्री रविंद्र जयराम चौधरी यांनी पुढील नियुक्त्या शहादा शहरासाठी घोषित करून त्यांना नियुक्तीपत्रे देण्यात आले.
शहादा शहरासाठी खान्देश तेली समाज मंडळाच्या वतीने लवकरच कार्याला सुरुवात करून खान्देश तेली समाज मंडळाच्या ध्येय धोरणानुसार तेली समाजाची सेवा करण्याचे नवनियुक्त पदाधिकारी यांनी सांगितले. नवनियुक्त पदाधिकाऱ्यांना नियुक्तीपत्र देण्याबरोबरच सर्व पदाधिकाऱ्यांनी शुभेच्छा देऊन त्यांचे अभिनंदन व कौतुक केले.
