वधु - वर फॉर्म

तेली समाजाला पुर्ववत एन.टी.चे आरक्षण देण्यात यावे - विलास वाव्हळ

11 October 2021 Teli samaj 48 views

  दिल्ली :- तेली समाज हा सुरूवातीला भटक्या मध्ये मोडला जात होता. परंतु राजकीय लोकांनी या समाजाला ओबीसीमध्ये वर्ग के ले. सद्यस्थितीत ओबीसीमध्ये ३४७ जातींचा समावेश आहे. त्यामुळे ओबीसींवर अन्याय होत आहे. आणि म्हणून तेली समाजाला पुर्ववत एन.टी.चे आरक्षण देण्यात यावे अशी मागणी बृहन्महाराष्ट्र तेली समाज संघटनेचे नेते विलास वाव्हळ यांनी केली आहे.

one day dharna Andolan for Teli Samaj NT caste status in Delhi Jantar Mantar तेली समाजाचा समावेश एन.टी.मध्ये करावा या मागणीसाठी २ ऑक्टोबरला बृहन्महाराष्ट्र तेली समाजाच्या वतीने दिल्ली येथे जंतर मंतर येथे एक दिवसीय धरणे आंदोलन करण्यात आले. यावेळी वाव्हळ यांनी वरीलप्रमाणे मागणी केली.

    बृहन्महाराष्ट्र तेली समाज संघटनेचे नाशिक विभागाचे उपाध्यक्ष आर.डी. चौधरी यांनी देखील यावेळी आपले मनोगत व्यक्त केले. ते म्हणाले, विदर्भात तेली समाज एन.टी.त होता मग खान्देश, मराठवाडा, मुंबई, कोकणमधील तेली समाजावर अन्याय का? असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला.

    धरणे आंदोलनास महिला अध्यक्षा सौ.लता कोलते. सरचिटणीस दिलीप खोंड, डॉ.लक्ष्मण चौधरी, महाराष्ट्र सचिव प्रशांत चौधरी, जळगांव जिल्हा महिला अध्यक्षा लता महाले, औरंगाबाद जिल्हा महिला अध्यक्षा सौ.वनिता गायकवाड यांच्यासह चाळीसगांव शहराध्यक्ष सुनिल चौधरी, उपाध्यक्ष दिनेश चौधरी, रविंद्र चौधरी, उमेश चौधरी, जगदीश चौधरी, डॉ. विजय चौधरी, भावराव चौधरी, रविंद्र चौधरी उपस्थित होते.

शेयर करा:

📺 संबंधित व्हिडिओ:

▶️
Click to load video
YouTube Thumbnail

lalu prasad yadav in Teli Samaj maha rally 26 February 1994