Bride / Groom Form

खान्देश तेली समाज मंडळाच्या वतीने फागणे गावात फराळ वाटप

12 November 2021 Teli samaj 88 views

     खान्देश तेली समाज मंडळाच्या वतीने गोरगरीब कष्टकरी यांची दिवाळी गोड करण्याचा संकल्प केला असून त्याचाच एक भाग म्हणून धुळे शहरालगत असलेल्या फागणे या गावात तेली समाजातील गरीब कुटुंबांना फराळ वाटप करण्यात आले. खान्देश तेली समाज मंडळाचे अध्यक्ष कैलास आधार चौधरी व सचिव रवींद्र जयराम चौधरी यांचे मार्गदर्शनाखाली तालुका कार्यकारणी तील सहसचिव बाळू भाऊ चौधरी तसेच सक्रिय सामाजिक कार्यकर्ते पोपटराव चौधरी व अनेक समाज बांधवांचे उपस्थितीमध्ये फागणे गावातील  गरीब समाज बंधू-भगिनींना दिवाळीच्या शुभेच्छा देऊन फराळ वाटप करण्यात आले.

Khandesh teli Samaj Dipawali Faral distribution      तसेच शहरातील साक्री रोड भागामध्ये असलेल्या कुष्ठ आश्रमा मध्ये मंडळाच्या वतीने दिवाळी निमित्त फराळ वाटप करण्यात आले. यावेळी मंडळाचे अध्यक्ष कैलास आधार चौधरी, सचिव रवींद्र जयराम चौधरी,कार्याध्यक्ष मनोज मधुकर चौधरी, धुळे शहर अध्यक्ष राजेंद्र भटू चौधरी, उपाध्यक्ष जयवंत रामदास चौधरी, छोटू भाऊ चौधरी आदी पदाधिकारी उपस्थित होते.

Share:

📺 संबंधित व्हिडिओ:

▶️
Click to load video
YouTube Thumbnail

Sahu Samaj hareli utsav in Telibandha Talab