Bride / Groom Form

तेली समाज जळगाव वधू - वर पालक परिचय पुस्तिका सूची प्रकाशन सोहळा संपन्‍न.

25 November 2021 teli samaj vadhu var melava 94 views

तेली समाज संस्थेतर्फे परिचय सूचीचे प्रकाशन सूची पथदर्शी ठरणार, मान्यवरांचे गौरवोद्गार

    जळगाव - श्री संताजी जगनाडे महाराज तेली समाज बहुउद्देशीय युवक मंडळातर्फे राज्यस्तरीय वधू-वर पालक परिचय पुस्तिका सूचीचे प्रकाशन रविवारी मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले.

Teli Samaj Jalgaon Vadhu Var pustak prakashan sohala     हॉटेल रिगल पॅलेस येथे कार्यक्रमाच्या सुरुवातीला मान्यवरांनी संताजी जगनाडे महाराज व कडुजी महाराज यांच्या प्रतिमेचे पूजन केले. अध्यक्षस्थानी उद्योजक सुरेश चौधरी होते. तर प्रमुख म्हणून अॅड. महेंद्र चौधरी, नामदेव चौधरी, संतोष चौधरी, विजय चौधरी, निर्मला चौधरी, मंडळाचे अध्यक्ष दत्तात्रय चौधरी, उपाध्यक्ष सीताराम देवरे, सचिव अनिल पाटील, दशरथ चौधरी, प्रभाकर महाले, नंदू चौधरी, नाना चौधरी, सुभाष चौधरी, बी. एम. चौधरी, महेश चौधरी, मधुकर देवरे, शरद चौधरी, अनिल नथ्थू चौधरी, अनिल पांडुरंग चौधरी, दिलीप चौधरी, सुनील चौधरी, अनिल चौधरी, निर्मला चौधरी, उपाध्यक्षा मीनाक्षी पाटील, आशा चौधरी उपस्थित होते. बी.एम. चौधरी यांनी युवक मंडळाचे कौतुक केले तर सुरेशचौधरी यांनी संघटित राहण्याचे आवाहन केले. सूत्रसंचालन अनिल पाटील तर दशरथ चौधरींनी आभार मानले.

Share:

📺 संबंधित व्हिडिओ:

▶️
Click to load video
YouTube Thumbnail

Delhi Sahu Rathore samaj yuvak yuvati parichay sammelan & pratibha samman samaroh