वधू - वर फॉर्म

खान्देश तेली समाज मंडळाच्या वधु वर परिचय मेळाव्यामध्ये मिळणार कोरोना प्रतिबंधक लस

25 November 2021 teli samaj vadhu var melava 100 views

    खान्देश तेली समाज मंडळाच्या वतीने रविवार, दिनांक २८ नोव्हेंबर २०२१ रोजी धुळे महानगरी मध्ये समाजभूषण स्व. दत्तात्रय लालचंद महाले नगर, हिरे भवन, कोर्टासमोर, स्टेशन रोड, धुळे याठिकाणी वधू-वर परिचय मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे.

     या मेळाव्या मध्ये समाजबांधवांसाठी व उपस्थित राहणाऱ्या नागरीकांसाठी कोरोना प्रतिबंधक लस देण्याची व्यवस्था मंडळाने केलेली आहे. या ठिकाणी कोव्हॅक्सीन व कोव्हिशील्ड दोन्ही प्रकारची लस देण्यात येईल. ज्यांचा पहिला डोस असेल त्यांना आधार कार्ड व स्वतःचा मोबाईल आणणे आवश्यक आहे. ज्यांचा दुसरा डोस असेल त्यांनी देखील आधार कार्ड व स्वतःचा मोबाईल जवळ ठेवणे आवश्यक आहे. मेळाव्यामध्ये सकाळी ९ ते दुपारी ४ वाजेपर्यंत कोरोना प्रतिबंधक लस चे दोन्ही प्रकारचा पहिला व दुसरा डोस देण्यात येईल. तरी समाजातील नागरिक व बंधू-भगिनींनी या संधीचा लाभ घ्यावा असे आवाहन खान्देश तेली समाज मंडळाच्या वतीने करण्यात येत आहे.

Share:

📺 संबंधित व्हिडिओ:

▶️
Click to load video
YouTube Thumbnail

Wardha teli Samaj gunvant vidyarthi satkar