श्री संत जगनाडे महाराज गाथा व पादुका दर्शन रथयात्रा
श्री संत जगनाडे महाराज गाथा व पादुका दर्शन रथयात्रा, जगनाडे महाराज पुण्यतिथी शताब्दीवर्षानिमित्त भव्य रथयात्रा समाज जनजागृती अभियान
या कार्यक्रमांच्या वेळी आपण सातारा जिल्ह्यातील गरीब व होतकरू विद्यार्थ्यांना प्रत्येकी रुपये ५०००/- हजार शिष्यवृत्ती स्वरुपात देत आहोत. या कार्यक्रमाच्या निमित्ताने ओ. बी. सी. आरक्षण म्हणजे नक्की काय ? व समाजासाठी त्याची आवश्यकता काय.? या विषयांवर डॉ. भूषण कर्डिले (महासचिव) हे मार्गदर्शन करणार आहेत. यानंतर सर्व समाजबांधवासाठी महाप्रसादाची व्यवस्था केलेली आहे. तरी सर्व बांधवांनी याचा लाभ घ्यावा. सायं. ५ वा. नंतर रथयात्रा पुढील प्रवासासाठी मार्गस्थ होणार आहे.
यानिमित्ताने या ठिकाणी समाजाबांधवांच्या मागणीवरुन वधूवरांची नोंदणी करण्यात येणार असून वधूवर पालक यांचे भेटी-गार्टीचा कार्यक्रम सकाळी १० वा. ते १.३० वाजेपर्यंत ठेवला आहे. यासाठी कोणतीही फी,प्रवेश शुल्क इ.आकारले जाणार नाही. तरी या संधीचाही फायदा समाज बांधवांनी घेणेचा आहे.
महाराष्ट्र प्रांतिक तेलिंक महासभा पश्चिम विभाग महाराष्ट्र समस्त तेली समाज सातारा जिल्हा श्री संताजी शैक्षणिक व सामाजिक विकास संस्था सातारा-महाराष्ट्र मा. पोपटराव गवळी मा. राम पडगे मा. विठ्ठलराव क्षीरसागर मा.सौ. सुरेखा हाडके मा. संजय शेडगे मा. नामदेवराव झकडे मा. पोपटराव भोज मा.हणमंत चिंचकर मा. सौ. कुसूम मेरुकर मा. अमोल राऊत मा. रमेश पवार मा. अनिल बेंद्रे मा. प्रदिप देशमाने मा. सौ. प्रिया गंधाले मा. नितीन देशमाने मा. लक्ष्मण गवळी मा. सुनिल किरवे मा. अमोल झगडे मा. सौ. शारदा किरवे मा. संजय भोज • दर्शन स्थळ : साई दत्त मंगल कार्यालय, वाढे-फाटा सातारा दि. १०/१२/२०२१ सकाळी १० ते ५ वा.
