वधू - वर फॉर्म

शहरात गुरुशिष्य स्मारक भागात रस्ता दुरूस्त करा तेली समाज मंडळाची मागणी, महापौरांना निवेदन

05 December 2021 sant santaji maharaj jagnade 111 views

     धुळे - संताजी जगनाडे महाराज यांची ८ डिसेंबरला जयंती व १ जानेवारीला पुण्यतिथी आहे. या पार्श्वभूमीवर शहरातील गुरु-शिष्य स्मारक परिसरातील रस्त्याची तातडीने दुरूस्ती करावी, अशी मागणी तेली समाज मंडळाने केली आहे. याविषयी महापौर प्रदीप कर्पे यांना निवेदन देण्यात आले.

     गुरुशिष्य स्मारक परिसरातून जाणाऱ्या रस्त्यावर ठिकठिकाणी खड्डे पडले आहे. रस्त्याची दुरूस्ती झाली नाही तर खड्डयात वृक्षारोपण करून गांधीगिरी करत आंदोलन करण्यात येईल असा इशारा, खान्देश तेली समाज मंडळाचे सचिव रवींद्र चौधरी, अध्यक्ष कैलास आधार चौधरी, मनोज मधुकर चौधरी, जयवंत रामदास चौधरी, गिरीश चौधरी उपस्थित होते.

Share:

📺 संबंधित व्हिडिओ:

▶️
Click to load video
YouTube Thumbnail

dussehra milan samaroh and Garba Mahotsav Sahu