वधु - वर फॉर्म

शिर्डी तेली समाज संघटनेच्‍या अध्यक्षपदी चौधरी, कार्याध्यक्षपदी महाले

05 December 2021 Teli samaj 55 views

    साकुरी : शिर्डी शहर तेली समाजाच्या वतीने शिर्डी येथे तेली समाज बांधवांची बैठक पार पडली. त्यात विविध प्रश्नांवर चर्चा करण्यात आली.यात प्रामुख्याने श्री संताजी महाराज जगनाडे जयंती नगरपंचायत शिर्डी येथे साजरा करण्यात येणार आहे. तसेच तेली समाज संघटनच्या शिर्डी शहर अध्यक्षपदी दीपक चौधरी तर शिर्डी शहर कार्याध्यक्षपदी सोमनाथ महाले यांची निवड करण्यात आली आहे.

     उर्वरित पदाधिकारी यांची निवड दि ६ डिसेंबर रोजी करण्यात येणार आहे. तसेच जयंतीनिमित्त व शिर्डी शहरातील पुढील वाटचाली बाबत चर्चा करण्यात येणार आहे.यावेळी शिर्डी शहर तेली समाजाचे जेष्ठ कार्यकर्ते ज्ञानेश्वर वाघचौरे यांच्या हस्ते संघटनचे नुतन अध्यक्ष दीपक चौधरी व कार्याध्यक्षपदी सोमनाथ महाले यांचा निवडीबद्दल त्याचा सत्कार करण्यात आला.

     यावेळी नगर जिल्हा तेली समाजाचे जिल्हाध्यक्ष वकील विक्रांत वाघचौरे यांनी निवडीला पाठींबा दिला. यावेळी राजेंद्र चौधरी,आशुतोष वाघचौरे यांनी मनोगत व्यक्त केले. शिर्डी शहर तेली समाजाचे मंगेश कवडे, दिलीप चौधरी, राजू पाडसवान, महेश कवडे, अनिल चौधरी, रवी कर्डीले, विठ्ठल जाधव, नामदेव वाघचौरे, गणेश वाघचौरे, सचिन लुटे, प्रशांत कवडे, नंदकुमार व्यवहारे, यशवंतराव वाघचौरे आदी उपस्थित होते. शिर्डी शहर तेली समाज बांधवांच्या सेवेसाठी विविध सामाजिक उपक्रमांची आखणी करून दर महिन्याला समाजाची फिरती बैठक घेण्यात येणार आहे.

शेयर करा:

📺 संबंधित व्हिडिओ:

▶️
Click to load video
YouTube Thumbnail

Sant Shiromani Sant Santaji Maharaj payi Wari sohala Aurangabad Teli Samaj