तेली समाज प्रबोधन मेळावा व श्री संत शिरोमणी जगनाडे महाराज जन्मोत्सव गडचिरोली
06 December 2021 sant santaji maharaj jagnade 25 views
संत संताजी जगनाडे महाराज संताजी समाज मंडळ, येवली ता. जि. गडचिरोली यांचे वतीने श्री संत शिरोमणी जगनाडे महाराज जयंतीनिमित्त्य समाज प्रबोधन मेळावा व जन्मोत्सव बुधवार, दि. ८ डिसेंबर २०२१ ला सकाळी ११.०० वा. / स्थळ : इंदिरा गांधी चौक, येवली येथे आयोजित करण्यात आलेला आहे.
तेली समाज गडचिरोली, येवली परिसरातील तेली समाजाच्या वतीने श्री संत शिरोमणी संताजी जगनाडे महाराज यांचा 'जन्मोत्सव कार्यक्रम' बुधवार दि. ०८/१२/२०२१ ला संपन्न होत आहे. महाराष्ट्राला संत परंपरेचा एक मोठा इतिहास आहे. या संतांनी तत्कालीन अनिष्ठ रूढी, वाईट परंपरा व अंधश्रध्देवर फार मोठे कोरडे ओढले आणि समाजाला त्यातून बाहेर काढून समाजात विज्ञानवादी दृष्टीकोन रुजविण्याचा फार मोठा प्रयत्न केला. परंतु समाजाला कायम अंधश्रेध्दत ठेऊ इच्छिणाऱ्या प्रस्थापित वर्गाला हे खटकणारे असल्याने त्यांनी संताचा सुध्दा फार मोठा छळ केला. परंतु अजूनही समाज त्या जुन्या अनिष्ठ रुढी, परंपरा व अंधश्रध्देच्या जोखंडातून मुक्त झालेला दिसत नाही. याउलट समाज जितका अधिक उच्च शिक्षीत होत आहे या प्रमाणात तो अधिक अंधश्रध्दाळू होताना दिसत आहे. समाजाला यातून मुक्त करण्याकरीता त्यादृष्टीने त्यांचे परिवर्तनवादी विचार, समाजात रुजावे, जनतेत वैचारिक परिवर्तन व्हावे, असे वाटते, कारण विचारांचास प्रभाव परिवर्तनवादीअसेल तर कौटुंबिक जीवन प्रगती पथावर जाईल. विचारात घडलेला बदल सवयी बदलतो, सवयीतून व्यक्ती घडते व समर्थ लोकशाही राष्ट्र बनवायचे असेल तर परिवर्तनासाठी महापुरुषांना अभ्यासून व वास्तव स्विकारुन पुढे जावे लागेल. म्हणून संत जगनाडे महाराज यांच्या जयंतीचे औचित्य साधून समाज प्रबोधन कार्यक्रम आयोजित करण्यात आलेला आहे. तरी सर्वानी सहपरिवार कार्यक्रमास उपस्थित राहावे ही विनंती संयोजका कडुन करण्यात आलेली आहे.
अध्यक्ष : मा. प्रभाकरजी वासेकर, जिल्हाध्यक्ष महाराष्ट्र प्रांतिक तेली समाज महासभा गडचिरोली • विशेष अतिथी : मा. प्रा. देवानंदजी कामडी, अध्यक्ष संताजी सोशल मंडळ, गडचिरोली प्रमुख मार्गदर्शक : मा. विलासराव निंबोरकर, मार्गदर्शक • प्रमुख पाहुणे : मा. डी.डी. सोनटक्के (से.नि. शिक्षक), मा. मारोतराव दुधबावरे, शिक्षक : मा. वासुदेवराव तडसे (प्राध्यापक), मा. अनिलराव कोठारे (कुनघाडा)
कार्यक्रमावली - बुधवार, दि. ०८/१२/२०२१ सकाळी ५.३० वा. : परिसर सफाई सकाळी ९.०० वा. : संताजीची पालखी, दिंडीयात्रा, मिरवणूक शोभायात्रासंताजी दर्शन सोहळा सकाळी ११.०० वा.: समाज प्रबोधन मेळावा सायं. ५.०० वा. : महाप्रसाद व सहभोजन रात्रो ७.०० वा. : भजन कार्यक्रम आयोजक संताजी समाज मंडळ, येवली (रामपुरी), गोविंदपूर, मारकबोडी. शिवणी, दर्शनी, दर्शनी चक, लालपेठ
शेयर करा:
📺 संबंधित व्हिडिओ:
▶️
Click to load video
झारखंड तेली समाज इतिहास और अनुसूचित जनजाति (ST) में शामिल करने की मांग – Teli Caste in Jharkhand