वधू - वर फॉर्म

अकोला तेली समाज आयोजित  संत संताजी जगनाडे महाराज जयंती उत्‍साहात साजरी

11 December 2021 sant santaji maharaj jagnade 85 views

     अकोला - संताजी नगर स्थित संत संताजी महाराज मंदिरात जयंतीचा कार्यक्रम साजरा करण्यात आला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्राचार्य प्रकाश डवले अध्यक्ष राज्य तेली समाज समन्वय समिती हे होते. राज्य सरचिटणीस प्रशांत शेवतकर, शेखर देठे राज्य समन्वयक, गोपाल थोटांगे, वैशाली निवाणे, श्वेता तायडे, शितल गोतमारे, दिनेश साठवणे, मेघा साठवणे उपस्थित होते. सर्वप्रथम संताजी जगनाडे महाराजांचे पूजन करण्यात आले. त्यानंतर संत संताजी जगनाडे महाराज यांच्या कार्याबाबत प्रकाश डवले व प्रशांत शेवतकर यांनी माहिती विशद करीत संतांची महाराजांचे कार्य हे अनन्यसाधारण होते याचे महत्त्व स्पष्ट केले. संताजी जगनाडे महाराज हे तुकाराम महाराजांनी बोललेले प्रत्येक शब्द गाथेमध्ये शब्दबद्ध करीत असतं म्हणजे त्यावेळी त्यांची स्मरणशक्ती ही किती अचाट होती याचे विवेचन केले. कार्यक्रमाचे आभार वैशाली निवाने यांनी मानले.

Share:

📺 संबंधित व्हिडिओ:

▶️
Click to load video
YouTube Thumbnail

Sahu Samaj Jaipur Lahariya utsav