Bride / Groom Form

एरंडेल तेली समाज मंडळाच्यावतीने संत जगनाडे महाराज यांची जयंती उत्साहात

12 December 2021 sant santaji maharaj jagnade 99 views

     तिरोडा - एरंडेल तेली समाज मंडळाच्यावतीने ८ डिसेंबर रोजी संत जगनाडे महाराज यांची ३९७ वी जयंती महिला मंडळ संयुक्त अशोक वार्ड, खामतलाव रोड, तिरोडा येथे साजरी करण्यात आली. याप्रसंगी समाजातील विविध मान्यवरांचा सत्कार सुद्धा करण्यात आला.

Erandel Teli Samaj Celebrat Sant Jagannade Maharaj Jayanti      कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी अशोक तरारे होते. प्रमुख पाहुणे म्हणून देवराव मुरे, नंदकिशोर शहारे, गौरीशंकर मुरे, मनोहर तरारे, मधु तरारे, कुमुद सातपुते, कविता मुरे, चंदा शहारे, मिना मुरे महिला अध्यक्षा हे उपस्थित होते.

     संत जगनाडे महाराज यांच्या छायाचित्राला माल्यार्पण करून दीप प्रज्वलन करण्यात आले. समाजातील सेवानिवृत्त झालेल्या कर्मचाऱ्यांचा सत्कार करण्यात आले. एरंडेल तेली समाजाच्यावतीने पत्रकार स्वप्नील शहारे व चुरडीच्या पोलीस पाटील कविता मुरे यांचा विशेष सत्कार करण्यात आला. प्रास्ताविक मंडळाचे अध्यक्ष हितेश मुरे यांनी मांडले. संचालन सुरेश शहारे यांनी केले. आभार नागेश तरारे यांनी मानले. भोजनाची व्यवस्था मंडळाकडून करण्यात आली. कार्यक्रमासाठी प्रशांत घोडमारे, शुभम शेंडे, विकास निकुळे, दीपक कावळे, अमोल शहारे, मनोज शहारे, रवी शहारे, राहुल तरारे, दिलीप तरारे, उरकुडाली तरारे, नरेंद्र तरारे, कुणाल शहारे, रोशन सातपुते, स्वप्नील शहारे यांनी सहकार्य केले.

Share:

📺 संबंधित व्हिडिओ:

▶️
Click to load video
YouTube Thumbnail

Umarga Teli Samaj Organization protest against Dhule atyachar