वधू - वर फॉर्म

संताजी महाराजांचे विचार घराघरांत पोचवा रवींद्र चौधरी : नेर येथे साकारणार गुरू-शिष्य स्मारक

12 December 2021 sant santaji maharaj jagnade 119 views

     नेर - ता. धुळे  - संताजी महाराजांचे विचार सर्व समाजांतील घराघरांत पोचविण्याची गरज असून, त्यांच्या विचारांचे अनुकरण करा हेच खरे अभिवादन असेल, असे मत खानदेश तेली समाज मंडळाचे सचिव रवींद्र चौधरी यांनी व्यक्त केले.

    येथील खानदेश तेली समाज शाखेतर्फे झालेल्या कार्यक्रमप्रसंगी संताजी महाराज यांची ३९७ वी जयंती साजरी करण्यात आली.

Sant Santaji Jagnade Maharaj Jayanti in Dhule    जिल्हा परिषद सदस्य आनंदराव पाटील अध्यक्षस्थानी होते. कार्यक्रमप्रसंगी खानदेश तेली समाज मंडळाचे अध्यक्ष कैलास चौधरी, नेरच्या सरपंच गायत्री जयस्वाल, शंकरराव खलाणे, मांगू मोरे, विजय कुंभार, कार्याध्यक्ष मनोज चौधरी, तालुकाध्यक्ष भटू चौधरी, चंद्रकांत चौधरी, राकेश चौधरी, युवा आघाडीचे जिल्हाध्यक्ष सुनील चौधरी आदी उपस्थित होते.

    नेर ग्रामपंचायत सदस्य सुमीत जयस्वाल यांनी मनोगत व्यक्त केले. गुलाब बाविस्कर यांनी धुळ्याप्रमाणे नेर गावातदेखील छोटेसे गुरू-शिष्य स्मारक असावे, असा प्रस्ताव मांडला. या प्रस्तावावर बोलताना नेर येथील सरपंच गायत्री जयस्वाल यांनी ग्रामपंचायतीमध्ये तसा ठराव करून लवकरच या गावामध्ये छोटेसे गुरू-शिष्य स्मारक साकारण्यात येईल, असे जाहीर केले. या वेळी अनेक समाजसेवकांनी गुरू-शिष्य स्मारकासाठी देणग्यादेखील जाहीर केल्या. युवा आघाडीचे जिल्हाध्यक्ष सुनील चौधरी यांनी संताजी महाराज यांच्या प्रतिमा वाटप केल्या व पुण्यतिथीच्या दिवशी स्मारकाचे भूमिपूजन मोठ्या उत्साहात करण्यात येईल, असे सांगितले. कैलास याळीस यांनी सूत्रसंचालन केले. नेर येथील ग्रामपंचायतीमध्येदेखील शासकीय आदेशाप्रमाणे संताजी महाराजांचे प्रतिमापूजन खानदेश तेली समाज मंडळाचे अध्यक्ष कैलास चौधरी यांच्या हस्ते करण्यात आले. या वेळी सरपंच गायत्री जयस्वाल, रवींद्र चौधरी यांच्या हस्ते हार, तसेच श्रीफळ अर्पण करण्यात आले. या वेळी ग्रामपंचायत सदस्य व गावातील ग्रामस्थ उपस्थित होते.

Share:

📺 संबंधित व्हिडिओ:

▶️
Click to load video
YouTube Thumbnail

Shri Sant Santaji Maharaj jagnade Punyathii amravati teli samaj