Bride / Groom Form

श्री संताजी महाराज जयंती जळगावात उत्‍साहात साजरी

12 December 2021 sant santaji maharaj jagnade 72 views

विद्यार्थ्यांनो, आकाशाला गवसणी घालता येईल, इतके यश मिळवा..!  मा.आमदार शिरीष चौधरी : पारोळ्यात गुणवंत विद्यार्थ्यांचा गुणगौरव

     पारोळा : अभ्यास एवढा करा की, यशाने आकाशाला गवसणी घालता आली पाहिजे, असे प्रतिपादन माजी आमदार शिरीष चौधरी यांनी केले.

    श्री संताजी महाराज जयंतीनिमित्त नवीन तेली भवन येथे प्रदेश तेली महासंघ व युवक महासंघाच्यावतीने तालुक्यातील गुणवंत विद्यार्थ्यांचा गुणगौरव व विविध क्षेत्रांत उल्लेखनीय काम करणारे तसेच राजकीय, सामाजिक क्षेत्रात संघटनेवर नियुक्त समाजबांधवांचा सत्कार करण्यात आला, त्यावेळी ते बोलत होते.

    यावेळी नगरसेविका रेखा चौधरी, बीडचे नगराध्यक्ष डॉ. भारतभूषण क्षीरसागर, प्रदेश तेली महासंघाचे प्रदेशाध्यक्ष विजय चौधरी, जिल्हाध्यक्ष के. डी. चौधरी, महिला जिल्हाध्यक्षा निर्मला चौधरी, आरोग्य सभापती नवल चौधरी, नगरसेवक कैलास चौधरी, महेश चौधरी, अशोक चौधरी, ज्येष्ठ समाजसेवक वामन चौधरी, माजी समाज अध्यक्ष प्रल्हाद चौधरी,रामचंद्र पाटील उपस्थित होते.

    सूत्रसंचालन योगेश चौधरी व आभार भागवत चौधरी यांनी मानले. यशस्वीतेसाठी भागवत चौधरी, प्रवीण चौधरी, सुनील चौधरी, कपिल चौधरी, राहुल चौधरी,स्वप्निल चौधरी,कल्पेश चौधरी, बंटी चौधरी,गोलू चौधरी, छोटू चौधरी, कैलास चौधरी, रवींद्र चौधरी, नवयुग सदस्य योगेश चौधरी, मनोज चौधरी, कैलास चौधरी, सूरज चौधरी, भारत चौधरी, गुणवंत चौधरी यांनी परिश्रम घेतले.

Share:

📺 संबंधित व्हिडिओ:

▶️
Click to load video
YouTube Thumbnail

राजिम भक्तिन माता की जीवन कथा | Rajim bhaktin Mata History