वधू - वर फॉर्म

संताजी महाराज जगनाडे जयंती पुण्‍यात साजरी

12 December 2021 sant santaji maharaj jagnade 98 views

     पुणे  - जगद्गुरू तुकाराम महाराज यांच्या अभंगाचे लेखक व आराध्य दैवत श्री संत संताजी जगनाडे महाराज यांची ३९७ वी जयंती उत्सवात साजरी करण्यात आली. समस्त तेली समाज संताजी प्रतिष्ठान कोथरूड यांच्या वतीने कर्वे नगर येथील श्री संताजी भवन येथे प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून दीप प्रज्वलन करण्यात आले. संस्थेचे अध्यक्ष रमेश भोज यांचे मार्गदर्शन आणि मान्यवरांच्या उपस्थितीत जयंती साजरी करण्यात आली. यावेळी पुणे तेली समाजाचे अध्यक्ष घनश्याम वाळुजकर आणि उद्योगपती संतोष माकुडे यांच्या हस्ते दीप प्रज्वलन करण्यात आले.

Sant Santaji Jagnade Maharaj jayanti in Pune     चंद्रकांत जगनाडे व विजयराव भोज यांनी पुष्पमाला अर्पण केली. यावेळी सुर्यकांत मेढेकर, रवींद्र उबाळे, लक्ष्मण कावडे, अरविंद देशमाने, सुरेश भोज, अशोक साळवणे, मिलिंद चव्हाण, मारुती नगीने, गणेश पिंगळे, मधुकर गुलवाडे, अनिल घाटकर, प्रवीण बारमुख, सुरेंद्र दळवी, सुरेखा देशमाने, जयश्री भोज, नीलम घाटकर, प्रिया देशमाने, मनीषा करपे, संगीता शिंदे यांच्यासह समाज बांधव उपस्थित होते. शहराध्यक्ष घनश्याम वाळंजकर यांनी यावेळी मार्गदर्शन केले. या कार्यक्रमाचे प्रास्ताविक रमेश भोज यांनी केले तर आभार दिलीपराव शिंदे यांनी मानले.

Share:

📺 संबंधित व्हिडिओ:

▶️
Click to load video
YouTube Thumbnail

PM नरेंद्र मोदी, तेली OBC समाज और UGC Bill Controversy - जाति है कि जाती ही नहीं