Bride / Groom Form

खान्देश तेली मंडळाच्या वतीने श्री संताजी महाराज जयंती

12 December 2021 sant santaji maharaj jagnade 105 views

     धुळे - तेली समाजाचे संत श्रेष्ठ संत शिरोमणी श्री संताजी जगनाडे महाराज यांचे ३९७ वी जयंती उत्साहात साजरी करण्यात आली. अध्यक्ष कैलास चौधरी, सचिव रवींद्र चौधरी, कार्याध्यक्ष मनोज चौधरी, शहर उपाध्यक्ष चंद्रकांत चौधरी, शहर सचिव राकेश चौधरी यांनी श्री संताजी महाराज यांच्या प्रतिमेचे पूजन करून माल्यार्पण केले. यावेळी वर्षभर चालणा-या जनजागृती प्रबोधन यात्रेचा शुभारंभ करण्यात आला. वर्षभर समाजातील अनिष्ट प्रथा यावर जनजागरण करण्यासाठी प्रबोधन यात्रा सुरू करण्यात आली आहे.

Sant Santaji Jagnade Maharaj Jayanti celebrate by the Khandesh teli Samaj     संध्याकाळी पाच वाजता गुरू-शिष्य स्मारक येथे खास पुणे येथून मागवलेल्या देव तुळशीचे पुष्पहार शिवसेना महानगरप्रमुख सतीश महाले, काँग्रेसचे प्रदेश सचिव युवराज करनकाळ, सामाजिक कार्यकर्ते संतोषू चौधरी यांच्या हस्ते श्री संताजी महाराज व तुकाराम महाराज यांना अर्पण करण्यात आले. यावेळी महाराष्ट्र लघुवेतन कर्मचारी संघाचे अध्यक्ष गिरीश चौधरी, तालुका अध्यक्ष भटू चौधरी, शहराध्यक्ष राजेंद्र चौधरी, महिला आघाडी अध्यक्ष सौ.मालती चौधरी, सचिव सौ. सविता चौधरी, कार्याध्यक्ष सौ.शुभांगी चौधरी, खजिनदार सौ. वंदना चौधरी, उपाध्यक्ष सौ समिधा सूर्यवंशी, सुनील सूर्यवंशी, योगेश चौधरी, मुकेश चौधरी, रमेश चौधरी, अमोल चौधरी, गजेंद्र चौधरी, सुरेश चौधरी,रमेश करनकाळ, किशोर थोरात, कल्पेश चौधरी, मुकेश चौधरी, ललित चौधरी, भाऊसाहेब चौधरी, छोटू चौधरी, प्रमोद चौधरी, दीपक चौधरी, प्रकाश चौधरी, गजानन चौधरी यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते. यावेळी स्मारकाच्या चारही बाजूने शंभर दीप प्रज्वलित करून फटाक्यांची आतषबाजी करण्यात आली.

Share:

📺 संबंधित व्हिडिओ:

▶️
Click to load video
YouTube Thumbnail

राजिम भक्तिन माता की जीवन कथा | Rajim bhaktin Mata History