वधु - वर फॉर्म

जळगाव जामोद राज्यस्तरीय तेली समाजाचा वधू-वर परिचय मेळावा संपन्न

20 December 2021 Teli samaj 20 views

     जळगाव जामोद संग्रामपुर तालुका तेली समाजाच्या सहकार्याने आयोजित राज्यस्तरीय वधू वर परीचय मेळावा समाज बांधवांच्या उपस्थितीत कोरोना नियमाचे पालन करून संपन्न झाला.

      कोरोणाच्या या नैसर्गिक आपत्तीमध्ये आपापल्या वधू व वरांचे लग्न जुळवण्यासाठी गावोगाव न फिरता जळगाव जामोद संग्रामपूर तेली समाजाच्या सहकार्याने वधू-वर परिचय मेळाव्याचे आयोजन १९ डिसेंबर २०२१ रोजी जळगाव जामोद येथे सकाळी दहा ते पाच या कालावधीत करण्यात आले होते . त्यासाठी अकोला जिल्ह्यातील समाजबांधवांनी सहभागी व्हावे म्हणून राज्य तेली समाज समन्वय समितीने आवाहन केलेले होते .

Jalgaon Jamod Rajyastariya Teli Samaj Vadhu var melava Bride and Groom Introduction Meeting        कोविड नियमांचे पालन करीत उपरोक्त वधु वर परिचय मेळावा सांस्कृतिक भवन जळगाव जामोद येथे उत्साहात संपन्न झाला . कार्यक्रमाचे नियोजन जळगाव जामोद संग्रामपूर येथील तेली समाज बांधवांनी अतिशय चोख केले होते. कार्यक्रम स्थळी सर्व अतिथी व समाज बांधवांसाठी जेवणाची विशेष व्यवस्था करण्यात आली होती. कार्यक्रमाचे भारदार नियोजन स्थानिक तेली समाज मंडळांनी उत्कृष्टरित्या केलेले होते. यावेळी आदरणीय शोभाताई रामदासजी तडस, उमेशजी साँपधारें, गजूअण्णा शेलार,  प्रा भूषण कर्डिले , विष्णुपंत मेहरे, विजय  चोपडे, राज्य तेली समाज समन्वय समितीचे राज्याध्यक्ष प्रा प्रकाशजी डवले , राज्य सरचिटणीस प्रशांत शेवतकर , राज्य समन्वयक चंद्रशेखर देठे ,  प्रवीण झापर्डे , विकास राठोड यांची उपस्थिती होती. उपरोक्त मेळाव्यासाठी रमेश अकोटकर, नंदकिशोर काथोटे, संजय चोपडे, श्याम पांडव, शरद गोमासे, अनिल भगत व त्यांच्या टीमने अथक परिश्रम घेतले . 

     या उपक्रमाद्वारे वेळेवर लग्न जुळवून आदर्श विवाह केल्यास आयोजकांच्या वतीने पाच हजार रुपयांचे रोख बक्षीस देण्यात येणार आहे . 

     यावेळी राज्य समन्वय समिती बुलढाणा जिल्हाध्यक्ष निमगाव येथील प्रतिष्ठित नागरिक अशोक चोपडे यांच्या निवासस्थानी व जळंब येथे माऊली नगरीमध्ये पंकज मंडवाले व गावातील प्रतिष्ठित नागरिकांसोबत चर्चा सुद्धा केली . संकलन श्याम सुलताने प्रसिद्धीप्रमुख राज्य तेली समाज समन्वय समिती.  

शेयर करा:

📺 संबंधित व्हिडिओ:

▶️
Click to load video
YouTube Thumbnail

तेली समाज उत्पत्ति के तीन सिद्धांत - तेली समाज इतिहास | Teli Samaj Caste History | Teli Kshatriya