महाराष्ट्र प्रांतिक तैलिक महासभेच्या वतीने समाज जोडो अभियान अंतर्गत संपूर्ण महाराष्ट्रात रथयात्रेस सुरुवात
20 December 2021 sant santaji maharaj jagnade 12 views
परळी : महाराष्ट्र प्रांतिक तैलिक महासभेच्या वतीने समाज जोडो अभियान अंतर्गत श्री. संत संताजी जगनाडे महाराज पालखी रथाचे परळीकरांच्या वतीने मोटारसायकल रॅलीने भव्य स्वागत करण्यात आले.
महाराष्ट्र प्रांतिक तैलिक महासभेच्या वतीने समाज जोडो अभियान अंतर्गत संपूर्ण महाराष्ट्रात रथयात्रेस संत संताजी महाराज जयंती निमित्त (८ डिसेंबर) संताजी महाराज जन्मस्थान चाकण येथून रथयात्रा सुरुवात करण्यात आली. स्थयात्रा प्रारंभ कार्यक्रमास महाराष्ट्र प्रांतिक तैलिक महासभा प्रदेश अध्यक्ष खासदार रामदासजी तडस, कार्याध्यक्ष अशोक काका व्यवहारे, कोषाध्यक्ष गजानन नाना शेलार, प्रदेश महासचिव डॉ. भूषण कर्डिले, युवा आपाडी प्रदेश अध्यक्ष आ. संदिप क्षिरसागर, सेवा आपाठी प्रदेशाध्यक्ष सुभाष पन्हाळे राज्य समन्वयक सुनिल चौधरी, युवा आपाढी प्रदेश महासचिव नरेंद्र चौधरी, संताजी महाराजाचे ११ वे वंशज गोपाळशेट जगनाडे, जनार्दन जगनाडे, रविंद्र करपे, ठाणे विभाग महीला आपाडी अध्यक्षा पुष्पाताई बोरसे, नाशिक विभाग महीला आघाडी अध्यक्षा विद्याताई कर्पे यांची प्रमुख उपस्थिती होती. रथयात्रेत संताजी महाराज मूर्ती, पूजा पादुका, हस्तलिखीत गाथा दर्शनासाठी आहेत. तसेच महाराष्ट्र प्रांतिक तैलिक महासभेच्या वतीने ओबीसी बरील अन्यायाला वाचा फोडण्यासाठी आंदोलन सुरु केले आहे व जातीमधील पोटजाती विसरुन तेली समाजसह ओबीसी समाज संघटन काळानुरूप कसे गरजेचे आहे याविषयी मार्गदर्शन करत आहेत. महाराष्ट्रात प्रत्येक जिल्हाकरिता महाराष्ट्र प्रांतिक तैलिक महासभा जिल्हा अध्यक्ष यांच्याकडे संताजी जगनाडे महाराजांची मूर्ती कोषाध्यक्ष गजानन शेलार यांच्यावतीने देण्यात येत आहे. संपूर्ण महाराष्ट्रात ८ डिसेंबर २०२१ ते १४ जानेवारी २०२२ या काळात जाणाऱ्या या पालखी सोहळ्याचे परळीत दुचाकी रैलीने ढोलताशांच्या गजरात स्वागत करण्यात आले. मोटारसायकल रॅली शहरातील आझाद चौक, छत्रपती शिवाजी महाराज चौक, एकमिनार चौक, स्टेशन रस्ता, बाजारसमीती, राणी लक्ष्मीबाई टॉवर चौक, जिजामाता गार्डन रस्ता पोलीस ठाणे मार्गे श्री.शनी मंदिरात स्वागत करण्यात आले. रैली मार्गावर ठिकठिकाणी श्री.संताजी जगनाडे महाराज यांच्या हस्तलिखित गाथेचे व पादुकाचे पुष्पहार अर्पण करून पुजन करण्यात आले. यानंतर सायंकाळी ८ वाजता समाज मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. या समाज मेळाव्यास गजानन नाना शेलार महाराष्ट्र प्रांतिक तैलिक महासभेचे राज्य कोषाध्यक्ष, अशोक काका व्यवहारे राज्य कार्याध्यक्ष, सुभाष पन्हाळे प्रदेशाध्यक्ष, नरेंद्र चौधरी युवा आघाडी महासचिव,सुनील चौधरी राज्य संघटक,रावसाहेब राऊत नांदेड विभाग अध्यक्ष पांडुरंग शिंदे नांदेड विभाग सचिव, मोहनलाल चौधरी संपर्क प्रमुख सेवा आघाडी, मयूर चौधरी युवा कार्यकर्ते, विठ्ठल रनबावरे युवा संघटक सचिव, ह.भ.प बालासाहेब काळे, शंकर आप्पा उदगीरकर विठ्ठल आप्पा चौधरी, शिवा लांडगे, संगमेश्वर फटके, शंकर फुटके, राधाताई फकिरे यांच्यासह पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते. मेळाव्यात बोलताना गजानन शेलार यांनी सांगितले की, महाराष्ट्र प्रांतिक तैलिक महासभेने सुरु केलेल्या तेली समाजाच्या अँप द्वारे समाजाची महाराष्ट्रभर जनगणना व्हावी व समाजाचा डाटा गोळा करणे गरजेचे आहे तसेच ओबीसींवर सतत होत असलेल्या अन्यायाबाबत वेगवेगळ्या मागनि वेळप्रसंगी रस्त्यावर उतरून तिव्र आंदोलन करावे लागेल त्याकरिता ओबीसीचे नेतृत्व वेळप्रसंगी आघाडीवर राहन करेल व त्यासाठी कोणत्याही गोष्टींसाठी सामोरे जाण्याची तयारी हा समाज करेल. महाराष्ट्रामध्ये सध्या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका लागल्या आहेत आणि या निवडणूकामध्ये ओबीसींवर राजकीय आरक्षणाचा मोठा घाला झाला आहे. सुप्रिम कोर्टान ओबीसीचे २७ टक्के आरक्षण नाकारले असून त्यासाठी इम्पीरिकल डाटा देण्याची मागणी केलेली आहे आणि सदर डाटा जोपर्यंत राज्य सरकार सुप्रिम कोर्टात सादर करत नाही तोपर्यंत ओबीसींचे आरक्षण मान्य करायला सुप्रिम कोर्ट तयार नाही. महाराष्ट्रामध्ये येत्या महिन्यामध्ये जेवढ्या निवडणूका होणार आहेत त्या निवडणूका मध्ये प्रतिनिधीत्व करण्याची आरक्षित जागांवर ओबीसींना संधी नाही. ही संधी मिळवून द्यावी आणि त्याठिकाणी ओबीसींची जागृती व्हावी हा या अभियानाचा मुख्य उद्देश आहे. हा जो ५६ टक्के समाज आहे ओबीसी समाजामध्ये जागृती व्हावी आणि जागृत झालेल्या समाजाने स्वतःच्या हक्कासाठी न्यायासाठी व अधिकारासाठी लढा उभारावा या भूमिकेतून समाज रथयात्रा व ओबीसी जनजागर अभियान सुरु केलेले असल्याचे मत श्री.शेलार यांनी मांडले. यावेळी अशोक काका व्यवहारे, यांनी आपले विचार मांडले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन चंद्रशेखर फुटके, प्रास्ताविक प्रा.प्रविण फुटके तर आभार नितीन चौधरी यांनी मानले.
महाराष्ट्र प्रांतिक तैलिक महासभेच्या वतीने संत श्री संताजी जगनाडे महाराज यांच्या विचारांचा प्रसार व प्रचार करण्यासाठी रथयात्रेचे आयोजन संपूर्ण महाराष्ट्रात करण्यात आले आहे. या यात्रेची बीड जिल्ह्यातील सुरुवात परळी पासुन झाली.परळीत राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने या यात्रेचे स्वागत करण्यात आले. महाराष्ट्र प्रांतिक तैलिक महासभे तर्फे श्री संत संताजी जगनाडे महाराज यांच्या जयंती दिनापासून ८ डिसेंबर २०२१ ते १४ जानेवारी २०२२ दरम्यान श्री क्षेत्र सुदंबरे येथून खासदार रामदास तडस, अशोक व्यवहारे, डॉ.कर्डिले,श्री गजनान शेलार यांच्या उपस्थितीत श्री संत संताजी जगनाडे महाराज रथयात्रेची सुरुवात झाली असून ही रथ यात्रा आज शुक्रवारी (दि.१७) परळीत आल्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष बाजीराव भैय्या धर्माधिकारी व पदाधिकारी यांनी स्वागत केले. या रथयात्रेतील संताजी जगनाडे महाराज यांनी लिहिलेली तुकाराम महाराजांची हस्तलिखित गाथा, जगनाडे महाराजांच्या पादुका यांचे दर्शन पदाधिकारी यांनी घेतले. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष तथा माजी नगराध्यक्ष बाजीराव धर्माधिकारी, नगरसेवक अनिल आष्टेकर, नितीन रोडे,रवी मुळे,राहुल ताटे, सुरेश नानावटे, ऍड.सुरेश शिरसाठ, प्रा.शाम दासुद, बालाजी वाघ, अमित केंद्रे, प्रदीप जाधव,लक्ष्मण ताटे,लहू हालगे आदींसह पदाधिकारी उपस्थित होते.
शेयर करा:
📺 संबंधित व्हिडिओ:
▶️
Click to load video
तेली समाजाच्या वतीने धुळे जिल्हयातील दोंडाई येथील घटनेचा निषेध