20 December 2021 sant santaji maharaj jagnade 78 views
महाराष्ट्र प्रांतिक तैलिक (तेली) हा सभेच्यावतीने श्री संताजी जगनाडे महाराज याच्या जंयतीचे औचित्य ८ डिसेंबर पासून राज्यात समाज जोडो रथयात्रा अभियान सुरु करण्यात आले आहे. रथयात्रेचे सोलापूरमध्ये आगमन होताच स्वागत व पूजन सोलापूर जिल्हा तैलिक महासभेचे सोलापूर जिल्हा अध्यक्ष अविनाश मार्तड यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी विशाल मार्तडे, शहराध्यक्ष अशोक कलशेट्टी, सचिव राजशेखर बिज्जरगी, कार्याध्यक्ष किसनराव, घोडके, अप्पाराव कोरे, धोडिंबा केवटे यांची प्रमुख उपस्थितीत विविध विषयांवर चर्चा करण्यात आली. रद्द झालेले ओबीसी आरक्षण, भविष्य काळातील समाज संघटन आदी विषयावर चर्चा करण्यात आली. नागनाथ कलशट्टी, संतोष कलशेट्टी, सिध्दांना कलशेती. विवेक घोडक, जयदत्त मातह, शैलेंद्र मातह, अच्युतराव बाबळे, महेश पेंडपाले उपस्थित होते. प्रास्ताविक शाहराजे पाटील, सत्रसंचालन चंद्रकांत शिंदे यांनी केले.