Bride / Groom Form

विदर्भ कुस्तीगीर संघटनेच्या अध्यक्षपदी रामदास तडस

22 December 2021 O.B.C. 91 views

     वर्धा : विदर्भ विभागीय कुस्तीगीर संघटनेच्या अध्यक्षपदी खा. रामदास तडस यांची सर्वानुमते निवड करण्यात आली. रविनगर, नागपूर येथे नुकत्याच पार पडलेल्या सभेत ही निवड करण्यात आली असून नवीन कार्यकारिणी जाहीर करण्यात आली आहे.

Ramdas Tadas as the President of Vidarbha kustigir sanghatana      यात आश्रयदाते म्हणून केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, राज्याचे क्रीडामंत्री सुनील केदार, माजी मंत्री दत्ता मेघे, माजी मंत्री गुलाबराव गावंडे, माजी मंत्री विजय दर्डा, प्रभाकरराव वैद्य तसेच नवीन कार्यकारिणीमध्ये कार्याध्यक्ष सीताराम भोतमांगे, मुख्य सचिव गणेश कोहळे, कोषाध्यक्ष हरिहर भवाळकर, उपाध्यक्ष म्हणून डॉ. संजय तिरथकर, विलास इंगोले, विष्णूपंत मेहेरे, रामदास सहार, बाळासाहेब मांगुळकर, गोकुळसेठ सानंदा, कार्यालयीन सचिव दिलीप इटनकर, सहसचिव रमेश खाडे, राजेंद्र गोतमारे, अनिल पांडे, रघुवीर अहीर, जितेन राजपूत, शरद टेकुलवार तर सदस्यपदी रणजीत बैस, अनिल आदमने, पंकज यादव, प्रल्हाद आलणे, छगन पडगीलवार, विलास लोणारे, संघटक मदनसिंग चावरे, रणवीरसिंग रहाल, नेरकर, विजय उजवणे, दयाराम भोयर, विक्रम गोसावी, पुरुषोत्तम तुपसांडे, विजय लाडसे, सुनीता तडस, कल्याणी इंगोले यांची निवड करण्यात आली.

Share:

📺 संबंधित व्हिडिओ:

▶️
Click to load video
YouTube Thumbnail

Sant Shiromani Sant Santaji Maharaj payi Wari sohala Aurangabad Teli Samaj