श्री संत शिरोमणी जगनाडे महाराज तेली समाज जोडो अभियान रथयात्रेचे चामोर्शीत भव्य स्वागत
30 December 2021 sant santaji maharaj jagnade 60 views
चामोर्शीत हजारो नागरिकांनी घेतले चरणपादुकांचे दर्शन
चामोर्शीः संत जगनाडे महाराजांचे जन्मगाव सदुंबरे, पुणे येथून निघालेल्या श्री संत शिरोमणी जगनाडे महाराज तेली समाज जोडो अभियान व रथयात्रेचे चामोर्शी शहरातील तेली समाज बांधवांनी जंगी स्वागत केले. याप्रसंगी रथयात्रेसोबत आलेल्या मान्यवर पाहुण्यांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत करण्यात आले. तसेच पादुकाचे विधीवत पुजन करण्यात आले. याप्रसंगी संजय कुनघाडकर, रघूनाथ भांडेकर, महेद्र किरमे, गजानन बारसागडे, आशिष पिपरे, रविंद्र वासेकर, सातपुते अॅड. खेमाजी सातपुते, रुषीजी वासेकर, लोमेश बुरांडे, दिलीप किरमे, कविता किरमे, राजु धोडरे, दिलीप चलाख, साईनाथ बुरांडे, भाष्कर बुरे, राहुल नैताम, प्रविण नैताम, कैलाश बोबाटे, कैलाश बोदलकर, तुषार दुधबळे, ओम सोमनकर, सुनिल सातपुते, कैलाश सातपुते, किशोर बुरे, सुरजागडे, चलाख, संगीता कुनघाडकर, वंदना वासेकर, अर्चना बारसागडे, निलिमा वासेकर, योगिता जुवारे, मंगला बोबाटे , यासह बहुसंख्य तेली समाज बंधु-भगिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते.