Bride / Groom Form

औरंगाबाद तेली समाजातर्फे संत संताजी जगनाडे महाराजांना पुण्यतिथीनिमित्त अभिवादन

05 January 2022 sant santaji maharaj jagnade 78 views

    औरंगाबाद : गारखेड्यातील चौंडेश्वरी मंदिरात औरंगाबाद तेली समाजातर्फे संत शिरोमणी संताजी जगनाडे महाराजांना पुण्यतिथीनिमित्त अभिवादन करण्यात आले. आ.अतुल सावे, अनिल मकरिये, नीलेश सोनवणे यांची यावेळी प्रमुख उपस्थिती होती. हभप प्रभाकर बोरसे महाराज, हभप स्नेहलता खरात, लक्ष्मी महाकाळ यांनी मनोगते व्यक्त केली.गणेश पवार यांनी सूत्रसंचालन केले. किशोर सुरडकर यांनी आभार मानले. रमेश उचित, कपिलदेव राऊत, भागीनाथ कडिर्ले, कृष्णा घोडके, अशोक शिंदे, सचिन सुरसे, ज्ञानेश्वर लुटे, पांडुरंग फिरके, शिवा महाले आदींनी परिश्रम घेतले.

Share:

📺 संबंधित व्हिडिओ:

▶️
Click to load video
YouTube Thumbnail

Sant Shiromani Sant Santaji Maharaj payi Wari sohala Aurangabad Teli Samaj