Bride / Groom Form

संताजी जगनाडे महाराज पुण्यतिथीनिमित्त पत्रकारांचा गौरव

08 January 2022 sant santaji maharaj jagnade 88 views

     नाशिक :नविन नाशिक तेली समाजाच्या वतीने जगद्गुरु संत तुकाराम महाराजांच्या मूळ गाथेचे लेखनकर्ते राष्ट्रसंत संताजी जगनाडे महाराज यांच्या ३३४ व्या पुण्यतिथीनिमित्त अभिवादन सोहळा साजरा करण्यात आला. पुण्यतिथीचे औचित्य साधून नवीन नाशिकमधील पत्रकारांचा गौरव करण्यात आला.

patrakar Gaurav on Sant Santaji Jagnade Maharaj punyatithi    याप्रसंगी व्यासपीठावर अध्यक्षस्थानी बी. जी. चौधरी, प्रमुख पाहणे श्री मंगल मासिकाचे संपादक जी. एम. जाधव, मंडळाचे अध्यक्ष शिवाजीराव चौधरी, पत्रकार दिलीप कोठावदे, राहुल गणोरे, उपसंपादक रमेश चौधरी, महिला मंडळाच्या अध्यक्षा ललिता रत्नपारखी, तसेच मंडळाचे उपाध्यक्ष विनायक सोनवणे, सचिव वसंत चौधरी, सहसचिव अर्जुन वेताळ, राजेंद्र गवळी, नितीन पवार, रघुनाथ चौधरी, संदीप कोते, रमेश चौधरी, संजय पाटील, दिगंबर नेरकर, डॉ. सुनील चौधरी, डॉ. राम बोरसे, डॉ. विजय पवार, रवींद्र चौधरी, प्रदीप कोते, शिवप्रसाद शिरसाठ, कैलास चौधरी, युवक मंडळाचे अध्यक्ष योगेश चौधरी, अभिजित बारगजे, सतीश काळे, सारंग सोनवणे, तसेच सर्वागिणी महिला मंडळाच्या उपाध्यक्षा सुवर्णा कोते, सचिव वर्षा वेताळ, खजिनदार सोनाली चोथेपाटील, सरिता सोनवणे, अॅड. सुवर्णा सोनवणे, सुनीता बोरसे, सोनाली चौधरी, उषा चौधरी, शोभा चौधरी, कौशल्या चौधरी, मीरा चौधरी, भारती चौधरी, चारुशिला पवार व पुष्पा चौधरी यांच्यासह महिला वर्ग उपस्थित होता.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक विनायक सोनवणे यांनी, तर सूत्रसंचालन संगीता पवार, संगीता कोते यांनी तर आभारप्रदर्शन मनीषा मोरे यांनी केले.

Share:

📺 संबंधित व्हिडिओ:

▶️
Click to load video
YouTube Thumbnail

Teli Ekta Rally MahaSammelan