संताजी ब्रिगेड तेली समाज महासभा तर्फे सिंधुताई सपकाळ यांना आदरांजली
संत जगनाडे महाराज चौक संताजी स्मारक या ठिकाणी सिंधुताई सपकाळ यांना संताजी ब्रिगेड तेली समाज महासभा तर्फे आदरांजली देण्यात आली या कार्यक्रमांमध्ये प्रामुख्याने उपस्थित जवाहर वसतिगृहाचे अध्यक्ष श्री रमेश गिरडे, संताजी ब्रिगेड तेली समाज महासभेचे संस्थापक श्री अजय भाऊ धोपटे प्रभाग 27 चे लोकप्रिय नगरसेवक हरीश डीकोंडावार संताजी ब्रिगेडचे कोषाध्यक्ष श्री रुपेश तेलमासरे महाराष्ट्र प्रदेश सहसंघटक श्री मंगेश साकरकर, श्री नंदु भाऊ धोपटे, संस्थेचे केंद्रीय सदस्य, श्री राकेश भावलकर, अध्यक्ष युवा आघाडी नागपूर शहर श्री प्रमोद उमाटे अध्यक्ष पूर्व नागपूर, श्री मंगेश कामडी अध्यक्ष मध्य नागपूर, श्री मगेश बोदरे, श्री मंगेश वंजारी, श्री विजय डाबरे, राष्ट्रीय मानव अधिकार आयोग ए:व जागृकता संघटन अध्यक्ष नागपूर जिल्हा सौ मंजुषाताई चकोले, संताजी ब्रिगेडच्या महिला आघाडी नागपुर जिल्हा प्रभारी सौ चित्राताई माकडे मिनाताई भुते उपाध्यक्ष नागपूर जिल्हा महिला आघाडी, प्राध्यापिका सौ दीपा ताई हटवार वरिष्ठ सल्लागार श्री रवींद्र बावनकर, वरिष्ठ सल्लागार श्री रमेश रोकडे श्री शंशीकात डांगरे, श्री मंगेश नरड, श्री अजय सराटकर, श्री अतुल कावळे, श्री राजेश हटवार, श्री सुनील भाऊ मानापुरे, श्री चदुभाऊ वैद्य, श्री हटवार साहेब, श्री मंगेश दिवटे ,श्री केशवजी सुरकार साहेब, इतर गणमान्य नागरिकांनी स्वतः पुढाकार घेऊन स्वर्गीय ,सिंधुताई सपकाळ यांना आदरांजली दिली..
प्राध्यापिका साै दीपा हटवार यांनी सिंधुताई चा संपूर्ण जीवन शैली बद्दल पूर्ण माहिती दिल्ली, सौ मंजुषा ताई चकोले सिंधुताई सपकाल ही कोणतेही पदाधिकारी व मंत्री नसतानासुद्धा आपल्या चांगल्या कर्मामुळे त्या जगाच्या आई झाल्या.. त्यांच्या उत्कृष्ट कामगिरीमुळे साऱ्या जगाला चांगल्या कामाची प्रेरणा मिळाली आपले विचार व्यक्त करताना मंजुषाताई चकोले यांनी सांगितले. संताजी ब्रिगेडच्या सौ चित्राताई माकडे यांनी सिंधुताई बद्दल बोलताना मरणासन्न अवस्थेतही, जीवन जगण्याच्या मुख्य रस्ता दाखविणारी एक मात्र महान आत्मा म्हणजे सिंधुताई सपकाळ असे आपले मत व्यक्त केले. संताजी ब्रिगेड तेली समाज महासभेचे संस्थापक श्री अजय भाऊ धोपटे सर्वांचा विचाराला आदर भाव देत कार्यक्रमास स्थगिती दिली.
