Bride / Groom Form

खान्देश तेली समाज मंडळ महिला आघाडी ची आ. सौ. मंजुळाताई गावित यांच्याशी भेट व चर्चा

10 January 2022 sant santaji maharaj jagnade 93 views

     धुळे - खान्देश तेली समाज मंडळ महिला आघाडीच्या वतीने लवकरच तेली समाजातील महिलांसाठी महत्त्वपूर्ण विषयावर महिला मेळावा आयोजित करण्यात येणार आहे. त्यासंदर्भात आज महिला आघाडीच्या अध्यक्षा सौ.मालती सुनील चौधरी, सचिव सौ. सविता प्रताप चौधरी, कार्याध्यक्ष सौ. शुभांगी मुकेश चौधरी, कु. चारू सुनील चौधरी यांनी साक्री विधानसभा मतदार संघाच्या कर्तव्यदक्ष महिला आमदार सौ. मंजुळाताई गावित यांची भेट घेऊन महिलांच्या विषयावर सामाजिक चर्चा करून कार्यक्रमाविषयी सविस्तर चर्चा केली.

Khandesh Teli Samaj Mandal Womens Front Meeting and discussion with MLA Manjulatai Gavit      लवकरच खान्देश तेली समाज मंडळ महिला आघाडीच्या वतीने या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात येणार असून सौ. गावित यांनी कार्यक्रमास शुभेच्छा देऊन कार्यक्रमाला येण्याचे आश्वासित केलेले आहे. तेली समाजातील महिलांना विविध विषयांवर मार्गदर्शन, समाज प्रबोधन करण्यासाठी या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात येणार आहे असे महिला आघाडीच्या वतीने कळविण्यात आलेले आहे.

Share:

📺 संबंधित व्हिडिओ:

▶️
Click to load video
YouTube Thumbnail

झारखंड तेली समाज इतिहास और अनुसूचित जनजाति (ST) में शामिल करने की मांग – Teli Caste in Jharkhand