वधु - वर फॉर्म

अहमदनगर जिल्हा तेली समाज महासभा राहता तालुका महिला आघाडी कार्यकारिणीची सर्वानुमते निवड

28 March 2022 Teli samaj 55 views

     कोल्हार खु ।।, ता राहता येथे अहमदनगर जिल्हा तेली समाज महासभेच्या राहता तालुका महिला आघाडीच्या राहता तालुका कार्यकारिणीची दिनांक 27/03/2022 रोजी सौ वैशाली ताई देशमाने यांच्या निवासस्थानी झालेल्या बैठकीत सर्वानुमते निवड कोल्हार येथील समाज बांधवांच्या उपस्थितीत करण्यात आली. राहता तालुका अध्यक्ष महिला आघाडी सौ वैशालीताई लक्ष्मणराव देशमाने, राहता तालुका सरचिटणीस महिला आघाडी सौ पूनमताई अमृत काळे, राहता तालुका कार्यकारिणी सदस्य आघाडी सौ उषाताई संजय घोडके कोल्हार शहर अध्यक्ष महिला आघाडी सौ राजश्री आदित्य काळे  यांची सर्वानुमते निवड करण्यात आली.

Ahmednagar Jilha Teli Samaj Mahasabha rahata Taluka Mahila aghadi karykarini      यावेळी जिल्हा संघटक महिला आघाडी सौ वैशाली ताई लुटे यांनी व्हिडिओ कॉन्फरन्स द्वारे उपस्थित महिला भगिनींना मार्गदर्शन केले तर माजी तालुका अध्यक्ष सौ अॅड.माधुरीताई लुटे यांनी नवनियुक्त पदाधिकारी यांना पुढील कार्यास शुभेच्छा दिल्या यावेळी जिल्हा निरीक्षक श्री बद्रीनाथ लोखंडे यांनी समाजातील महिला भगिनींना आपले हक्काचे स्वतःचे व्यासपीठ उपलब्ध केले असून यापुढे समाजाचे काम करतांना दिलखुलास आणि नियोजित पद्धतीने काम करावे असे सांगितले तर जिल्हा अध्यक्ष अॅड.विक्रांत वाघचौरे यांनी  महिलांना फक्त बचत गट यावर अवलंबून न राहता यापुढेही अनेक योजना आहे याचा फायदा घ्यावा यासाठी योग्य मार्गदर्शन करू असे आश्वासन दिले व येत्या 13 मे रोजीच्या आयोजित करण्यात आलेल्या सामुदायिक विवाह सोहळ्याची जोमाने तैयारी करण्यास सांगितले त्यामुळे समस्त समाजात नवचैतन्य निर्माण झाले असून असून समाज बांधवांमध्ये मोठा आत्मविश्वास निर्माण झाला आहे.

     यावेळी सर्व निवड झालेल्या महिला पदाधिकारी यांना जेष्ठ मार्गदर्शक व जिल्हा उपाध्यक्ष माजी कृषी अधिकारी श्री सुदेशराव नागले साहेब व श्री बाबासाहेब देशमाने काका यांच्या हस्ते निवडीचे पत्र सोपविण्यात आले व पुढील कार्यास शुभेच्छा देण्यात आल्या, उपस्थित महिला भगिनींचे आभार राहता तालुका कार्याध्यक्ष युवक आघाडी श्री सचिन लोखंडे यांनी मांडले 

     यावेळी सौ रोहिणी ताई लोखंडे, सौ शोभा देशमाने, सौ अलका देशमाने,सौ हिराबाई देशमाने, सौ रंजना कसबे,सौ मनीषा काळे, सौ सुनीता कर्डीले, सौ निर्मला काळे,सौ वैशाली काळे, श्रीमती दुर्गा देशमाने, सौ कल्याणी देशमाने आदी महिला भगिनी व श्री रेवणनाथ काळे, श्री संजय घोडके,जेष्ठ मार्गदर्शक श्री बाबासाहेब देशमाने आदी समाज बांधव मोठया संख्येने उपस्थित होते.

शेयर करा:

📺 संबंधित व्हिडिओ:

▶️
Click to load video
YouTube Thumbnail

Shri Sant Santaji Maharaj jagnade Punyathii amravati teli samaj