वधु - वर फॉर्म

श्री संताजी सहकारी पतसंस्था गडचिरोली जिल्हा पतसंस्थेच्या नोंदणीसाठी सभा

28 March 2022 sant santaji maharaj jagnade 20 views

     दिनांक २७-३/२०२२ रोजी रविवारला मौज सोनापूर ता चामोर्शी येथे  "श्री संताजी सहकारी पतसंस्था गडचिरोली जिल्हा"या पतसंस्थेच्या नोंदणीसाठी   कुठलीही पूर्वसूचना नसतांना गावकरी बंधूची  अचानक सभा घेण्यात  आली. या सभेत अवघ्या अडीच ते तीन तासात  सुमारे ४० ते ४५ सजग व सूज्ञ नागरिकांनी  श्री संताजी  सहकारी पतसंस्थेची रीतसर नोंदणी केली व आमच्या पतसंस्था निर्मिती कार्याला अभूतपूर्व प्रतिसाद दिला. ही बाब अतिशय आश्चर्य जनक व गावकरी बांधवांच्या जागृत नागरिकत्वाची साक्ष देणारी ठरली. तसेच सोनापूर  गावातील नागरिक समाज बांधव व त्यांचा प्रतिसाद हा  पत संस्थेच्या निर्मितीसाठी तन, मन ,धन व वेळ देणारा आहे याचा प्रत्यक्ष प्रत्यय आला.

     सोनापूर येथे झालेल्या सभेला  गावातील प्रतिष्ठित नागरिक श्री श्रावणजी पाटील दूधबावरे (माजी सरपंच),श्री यादवरावजी  कुनघाडकर (माजी सरपंच) ,श्री अशोकरावजी  वासेकर माजी सैनिक, श्री चांगदेव पाटील दुधबावरे, श्री महादेवरावजी चलाख व सुरेशरावजी दुधबावरे प्रतिष्ठित नागरिक, श्री शेषरावजी कोहळे (उपसरपंच), श्री आशिष चलाख  व इतर युवा प्रतिनिधी उपस्थित होते. यांच्या  सहकार्याविना सभासद नोंदणीचे एवढे मोठे शिव धनुष्य पेलणे शक्यच नव्हते. परंतु "गाव करी ते राव न करी " या म्हणीचा प्रत्यय देत त्यांनी आम्हाला अत्युच्च सहकार्य करून सोनापूर वासीय जनता समाज कार्यात सदैव पुढेच राहील याची खात्री दिली. परत एकदा सोनापूर वासीय गावकरी समाज बांधवांचे मनापासून अभिनंदन.आमच्या पतसंस्थेच्या पाठीशी पुढेही  असाच आपला हात असू द्यावा.

शेयर करा:

📺 संबंधित व्हिडिओ:

▶️
Click to load video
YouTube Thumbnail

Amravati Teli Samaj Gunvant Vidyarthi Satkar