Bride / Groom Form

अकोला साहू तेली समाज द्वारा आयोजित माॅ कर्मा जयंती उत्सव.

28 March 2022 Teli Samaj Maharashtra 88 views

   अकोला येथे साहू तेली समाज द्वारा आयोजित माॅ कर्मा जयंती उत्सव व महाप्रसाद कार्यक्रम आय एम हॉल मध्ये संपन्न झाला. यावेळी समाजातील विविध संघटनांचे मान्यवर तसेच राज्य तेली समाज समन्वय समितीचे अध्यक्ष प्राचार्य प्रकाश डवले सर, सरचिटणीस प्रशांत शेवतकर सर , जिल्हा परिषद अकोला चे माजी अध्यक्ष आदरणीय बालमुकुंदजी भिरड , प्रतिष्ठित नागरिक रमेशजी गोतमारे, श्रीजी ट्यूशन क्लासचे संचालक अनीलजी वानखडे, माजी मनपा गटनेता योगेशजी गोतमारे, प्राध्यापक विजयजी थोटांगे, प्रा विकासजी राठोड, नगरसेवक शशिकांत चोपडे, श्यामजी सुलताने त्यांनी माॅ कर्मा देवी व संताजी जगनाडे महाराज यांच्या प्रतिमेचे पूजन केले .
  Akola Sahu teli Samaj aayojit maa Karma Jayanti Utsav   साहू तेली समाजाच्या वतीने निखिल श्रीनगर , डॉक्टर योगेशजी साहू , पंकज साहू , डॉक्टर नरेंद्र श्रीवास व आयोजन समितीच्या सर्व सदस्यांनी अप्रतिम कार्यक्रम व्यवस्था व स्वादिष्ट सुरूची भोज आयोजित केला होता . राज्य तेली समाज समन्वय समितीच्या वतीने आयोजकांचे अभिनंदन करण्यात आले .
    शिस्तबद्ध व सुयोग्य नियोजन मेळाव्याचे होते . यानिमित्त विविध कार्यक्रमांची मांदीयाळी उपरोक्त ठिकाणी आयोजित करण्यात आलेली होती . उत्साहपूर्ण वातावरणात कार्यक्रम साजरा करण्यात आला . राज्य तेली समाज समन्वय समिती महाराष्ट्र छत्तीसगड गुजरात
 

Share:

📺 संबंधित व्हिडिओ:

▶️
Click to load video
YouTube Thumbnail

Mahasamund Sahu Samaj pratibha samman samaroh