महाराष्ट्र मुस्लिम तेली परिषदेच्या वतीने सर्वधर्मीय विद्यार्थ्यांना मोफत जात प्रमाणपत्राचे लॅमिनेशन करुन वाटप
महाराष्ट्र मुस्लिम तेली परिषद व प्रेस कॉस्सिल ऑफ महाराष्ट्राचा उपक्रम
बदनापूर - विद्यार्थ्यांना विनासायास सर्वधर्मिय जात प्रमाणपत्र काढून त्याला लॅमिनेशन करुन वाटप करण्याचा स्त्युत्य उपक्रम महाराष्ट्र मुस्लिम तेली परिषद व प्रेस कॉन्सिल ऑफ महाराष्ट्रच्या माध्यमातून राबवण्यात येत आहे. या उपक्रमाला शुभेच्छा देत मिळालेली प्रमाणपत्रे डिजिटल स्वाक्षरीने मिळालेली असून ते सांभाळन त्याचा उपयोग करण्याचे आवाहन पोलिस उपविभागीय अधिकारी निरज राजगुरू यांनी केले. ते महाराष्ट्र मुस्लिम तेली परिषद व प्रेस कॉन्सिल ऑफ मार्फत जात प्रमाणपत्र वितरण कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानावरून बोलत होते. या कार्यक्रमात एकूण ९३१ जात प्रमाणपत्रे काढून देण्यात आली. त्याचे प्रतिनिधीक स्वरूपात वाटप करण्यात आले.
पोलिस निरीक्षक शिवाजी बटेवाड यांनी अकरमखान पठाण करत असलेल्या समाजकार्याबद्दल त्यांचे कौतुक करून त्यांच्या समयसुचकतेबाबत उहापोह केला. तहसीलदार रमेश मुंडलोड यांनी जात प्रमाणपत्र काढताना सर्वसामान्य ग्रामस्थांना अडचणी येऊ नये म्हणून सर्वधर्मिय जात प्रमाणपत्रे काढून त्याचे वितरण करण्याचा स्त्युत्य, असा उपक्रम राबवून सामाजिक बांधिलकी जपली असून, सर्व सामाजिक संघटनेने हा आदर्श घेऊन सामाजिक कार्य करावे, असे आवाहन केले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक करताना अक्रमखान पठाण यांनी सांगितले की, बदनापूर तालुक्यासह विविध ठिकाणच्या ग्रामस्थांसाठी महाराष्ट्र मुस्लिम तेली परिषद व प्रेस कॉन्सिल ऑफ महाराष्ट्रने पुढाकार घेऊन संचिका जमा करून सर्व धर्मिय ९३१ जात प्रमाणपत्र बनवून घेतले. सामान्य नागरिकांना घरपोच जात प्रमाणपत्र देण्याचा उपक्रम मुस्लिम तेली परिषदेमार्फत राबवण्यास आम्ही सुरुवात केली या आधी झालेल्या शिबिरात जवळपास ३५० जातप्रमाणपत्राचे वितरण करण्यात आलेले होते. त्या अनुभवातून या वेळी आम्ही ९३१ प्रमाणपत्रे विनामुल्य काढून दिली असून पुढेही सामाजिक कार्यात आम्ही वेळोवेळी सहभाग नोंदव असे सांगितले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार डॉ.यशवंत हाके यांनी मानले.
यावेळी मिर्झा सुलेमान बेग, मिर्झा इलियास बेग, माजी सरपंच बाबूराव जाधव, रसूल खान, शेख हकिम साहेबलाल, डॉ. जनार्धन पाटील, डॉ.प्रतिभा पाटील, शेख बशीर, मिझा नवाब बेग, मिझा जावेद बेग, योगेश कांबळे, शेख नजीर इनामदार, रितेश रेगुडे, बाजीराव नावळे, शेख अय्युब टेलर, नगरसेवक बाबासाहेब क-हाळे, शेख गुलाम अहेमद, हाजी हाजी दरबार बेग, हाजी सय्यद, शेख जफर,राजु कुरेशी, मिर्झा अफजल बेग, सय्यद नसीर, शेख अजहर, हाजी शेख सलाम, शामीर पटेल, शेख सलिम, जावेद शहा, मिझ शाद बेग, रांजणगावचे सरपंच शेख नुर, देवगावचे माजी सरपंच मिझा गफार बेग, शेख लाला, मिझा अमिन बेग,मिर्झा हबीब बेग, मिर्झा अय्युब बेग, सय्यद आसेफ, बाबुलाल खान, हाजी शेख अन्वर, शेख नसीर भाई, शेख मुंशी, कृष्णा पठाडे, संतोष कांबळे, शेख हारुण आदींसह मोठया संख्येने ग्रामस्थांची गर्दी होती. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी महाराष्ट्र मुस्लिम तेली परिषदेचे अध्यक्ष तथा प्रेस कॉन्सिल ऑफ महाराष्ट्रचे सेक्रेटरी अॅड. अकरमखान पठाण, उपाध्यक्ष मिा अहेमद बेग, अय्युब पठाण, सरचिटणीस तन्वीर, कोषाध्यक्ष शेख शौकत, सय्यद रफिक अली, शेख हकिम साहेबलाल, शेख मोबीन, मिझा जावेद बेग, शेख बशीर, सय्यद अहेमद, मिर्झा कलिम बेग, मिझा इलियास बेग, सय्यद नसीर बिरादर आदींनी परिश्रम घेतले.
