Bride / Groom Form

सातारा तेली समाज वधू-वर पालक परिचय मेळावा १० एप्रिल रोजी

08 April 2022 teli samaj vadhu var melava 95 views

      सातारा जिल्हा समस्त तिळवण तेली समाज संघटनेच्यावतीने रविवार, दि. १० एप्रिल रोजी करंजे नाका परिसरातील महासैनिक भवन येथे राज्यस्तरीय तेली समाज मोफत वधू-वर पालक परिचय मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे.

Satara teli Samaj Vadhu var melava 2022      महासैनिक भवनात सकाळी १० ते सायंकाळी ५ या वेळेत आयोजित करण्यात आलेल्या या मेळाव्यात वधूवरांची माहिती असलेल्या पुस्तिकेचे प्रकाशन मान्यवरांच्या हस्ते करण्यात येणार आहे. यासाठी वधू-वरांची संपूर्ण माहिती असलेला फॉर्म भरून जमा करण्याची मुदत ३० मार्च करण्यात आली आहे. याआधी आयोजित करण्यात आलेल्या मेळाव्यामुळे अनेक वधू - वरांचे विवाह जुळले असून पैकी एक विवाह मेळाव्याच्या ठिकाणी मान्यवरांच्या उपस्थितीत करण्यात होणार आहे. या मेळाव्यात सातारा, सांगली, कोल्हापूर, पुणे, मुंबई या जिल्ह्यातून वधू - वर व पालक उपस्थित राहणार आहेत. या मेळाव्याचा सर्व समाज बांधवांनी लाभ घ्यावा असे आवाहन सातारा जिल्हा समस्त तिळवण तेली समाज संघटनेच्यावतीने करण्यात आले आहे.

Share:

📺 संबंधित व्हिडिओ:

▶️
Click to load video
YouTube Thumbnail

kokanastha Teli Samaj Teli Ghana