वधू - वर फॉर्म

खान्देश तेली समाज मातृ - वंदन सोहळ्यासाठी पवित्र गोदावरी (प्रतिगंगा) जल चे संकलन

07 May 2022 Teli samaj 103 views

मातृ-वंदन सोहळ्यासाठी नाशिक येथील रामकुंड येथून पवित्र गोदावरी (प्रतिगंगा) जल चे संकलन

    धुळे - येथील खान्देश तेली समाज मंडळाच्या वतीने मातृदिनाच्या निमित्ताने रविवार, ८ मे रोजी आयोजित करण्यात आलेल्या अभूतपूर्व अशा मातृ-वंदन सोहळ्यासाठी वेगवेगळ्या प्रसिद्ध तीर्थक्षेत्राहून जलतीर्थ संकलित करण्यात येत आहे.

Khandesh teli Samaj Matru Vandana Sohala Godavari Jal Sankalan     खान्देश तेली समाज मंडळाचे कार्याध्यक्ष श्री मनोज मधुकर चौधरी ( चिलंदे ), श्री ईश्वर हरी चौधरी,सौं.सुरेखा ईश्वर चौधरी,सौ.रंजना मनोज चौधरी ( चिलंदे ), श्री विशाल ईश्वर चौधरी,सौ.गायत्री विशाल चौधरी यांनी हिंदू धर्मातील पवित्र समजल्या जाणाऱ्या प्रतिगंगा गोदावरी नदीचे जलतीर्थ नाशिक येथे जाऊन दर्शन घेऊन गोदावरी,वरुणा, अरुणा या नदींच्या पवित्र त्रिवेणी संगमावरुन जलतीर्थ संकलित केले.

    याप्रमाणे पवित्र ठिकाणच्या जलतीर्थाचे पूजन करून त्याने मातेचे पाद्य पूजन करून मातेला वंदन करण्याच्या या अविस्मरणीय सोहळ्यामध्ये आपण सर्वांनी साक्षीदार व्हावे व मातृ-वंदन सोहळ्याची शोभा वाढवावी असे आवाहन खान्देश तेली समाज मंडळाच्या वतीने करण्यात येत आहे.

 

Share:

📺 संबंधित व्हिडिओ:

▶️
Click to load video
YouTube Thumbnail

संत संताजी जगनाडे महाराजानां मूठमाती देण्यासाठी वैकुंठातून आवतरले तुकोबाराय | Santaji & Sant Tukaram