वधु - वर फॉर्म

खान्देश तेली समाज वधू - वर परिचय मेळावा यशस्वी करण्याचा निर्धार

12 May 2022 teli samaj vadhu var melava 73 views

खान्देश तेली समाज मंडळाची बैठक संपन्न

     धुळे - खान्देश तेली समाज मंडळाची वार्षिक बैठक रविवार,दिनांक ८ मे रोजी दुपारी तीन वाजता संपन्न झाली. या बैठकीत खान्देश तेली समाज मंडळाच्या सर्व पदाधिकाऱ्यांनी नियोजित नोव्हेंबर महिन्यात होणारा आहे वधु-वर परिचय मेळावा यशस्वी करण्याचा निर्धार केलेला आहे. १३ नोव्हेंबर २०२२ रोजी मेळावा घेण्याचे निश्चित केले असून याआधी तारीख जाहीर करण्यात आलेली आहे. त्या तारखेला सर्वांनी एकत्र घेऊन मेळावा यशस्वी करण्याचा निर्धार यावेळी केला.

Khandesh teli Samaj Vadhu Var Parichay melava 2022 Meeting      बैठकीच्या सुरुवातीस संपूर्ण वर्षभराचा जमा खर्चाचा अहवाल सादर करण्यात आला या हिशोबास सर्वांनी हात उंचावून मंजुरी दिली. त्यानंतर विविध विषयांवर चर्चा होऊन नियोजित वधू- वर परिचय मेळावा यशस्वी करण्याचा निर्धार सर्वांनी केला. वेगवेगळ्या सामाजिक विषयांवर यावेळी चर्चा करण्यात आली. अनेकांनी आपले मनोगत व्यक्त केले. बैठकीमध्ये धुळे व जळगाव जिल्ह्यातील अनेक पदाधिकारी उपस्थित होते.

    अत्यंत खेळीमेळीच्या वातावरणात झालेल्या या बैठकीच्या अध्यक्षस्थानी मंडळाचे अध्यक्ष कैलास आधार चौधरी होते. मंडळाचे सचिव रविंद्र जयराम चौधरी यांनी सर्व जमाखर्च सादर करून वर्षभरातील कामगिरीचा आढावा दिला. महिला आघाडी च्या कार्यकारिणीची लक्षणीय उपस्थिती यावेळी होती. याच वेळी नवीन नियुक्ती झालेल्या महिला आघाडीच्या पदाधिकाऱ्यांना नियुक्ती पत्र अध्यक्ष सौ. मालती चौधरी व सचिव सौ. सविता चौधरी यांच्या हस्ते देण्यात आले. खेळीमेळीच्या वातावरणात बैठक संपन्न झाली.

शेयर करा:

📺 संबंधित व्हिडिओ:

▶️
Click to load video
YouTube Thumbnail

Aurangabad Teli Samaj Sant Shiromani Sant Santaji Maharaj payi dindi sohala