वधू - वर फॉर्म

खान्देश तेली समाज मंडळाच्या वतीने शालेय गरीब मुलींना दप्तर वाटपाचे आयोजन

28 July 2022 sant santaji maharaj jagnade 120 views

     जामनेर - खान्देश तेली समाज मंडळ जामनेर तालुक्याचे अध्यक्ष श्री अजय अशोक चौधरी यांची मुलगी कु.ईशिका हिच्या वाढदिवसाच्या निमित्ताने बुधवार दि. २७ रोजी शालेय शिक्षण घेणाऱ्या गरीब मुला-मुलींना शालेय दप्तर वाटप करण्यात येणार आहे. जामनेर तालुक्यातील मोयखेडा दिगर येथील जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शाळेत हे दप्तर वाटप करण्यात येतील. खान्देश तेली समाज मंडळाच्या वतीने या कार्यक्रमाचे आयोजन तालुकाध्यक्ष अजय अशोक चौधरी यांनी केले असून संपूर्ण तालुका कार्यकारिणी व शहर कार्यकारणी त्यांना सहकार्य करीत आहे. अजय चौधरी यांनी आयोजित केलेल्या या कार्यक्रमास अनेकांनी शुभेच्छा दिलेल्या असून बुधवार दि. २७ रोजी जामनेर शहर व तालुक्यातील पदाधिकारींनी मोयखेडा दिगर या.जामनेर येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत उपस्थित राहावे असे आवाहन खान्देश तेली समाज मंडळाचे जामनेर तालुकाध्यक्ष अजय अशोक चौधरी यांनी केलेले आहे.

Share:

📺 संबंधित व्हिडिओ:

▶️
Click to load video
YouTube Thumbnail

UGC Bill Controversy: मोदी जी और तेली समाज पर 'षड्यंत्र' की सच्चाई ?