Bride / Groom Form

तैलिक महासभा आघाडी सुरेश पिंगळे नवे जिल्हाध्यक्ष

28 July 2022 Teli samaj 95 views

     नाशिक - महाराष्ट्र प्रांतिक तैलिक महासभा युवा आघाडी दक्षिण नाशिक जिल्हा अध्यक्षपदी सुरेश पिंगळे यांची नुकतीच निवड करण्यात आली आहे. महाराष्ट्र प्रांतिक तैलिक महासभेचे प्रदेशाध्यक्ष खासदार रामदास तडस यांच्या हस्ते नुकतेच नियुक्तीपत्र देण्यात आले. यापूर्वी सुरेश पिंगळे यांनी नाशिक शहर व जिल्ह्यामध्ये सामाजिक कार्यातून संघटना वाढीसाठी भरीव कामगिरी केली असल्याने प्रदेशाध्यक्ष रामदास तडस यांनी ही महत्त्वाची जबाबदारी पिंगळे यांना दिली आहे. निवडीप्रसंगी महासचिव डॉ. भूषण कर्डीले, कार्याध्यक्ष अशोक व्यवहारे, गजानन शेलार, विद्या कर्पे, नाशिक जिल्हाध्यक्ष डॉ. शरद महाले, रत्नाकर करंकाळ, संतोष कदम, सागर चोथेपाटील, सागर कर्पे, वृंदा रायजादे, लता वालझाडे, सविता बोरसे, गोरख शिरसाठ, किरण वालझाडे, सचिन शिंदे, कैलास कोरडे आदी उपस्थित होते.

Tailik Mahasabha Aghadi Suresh Pingale is the new district president

 

Share:

📺 संबंधित व्हिडिओ:

▶️
Click to load video
YouTube Thumbnail

teli ghana kohlu