Bride / Groom Form

महाराष्ट्र प्रांतिक तैलिक महासभा धुळे महिला आघाडीच्या वतीने वृक्षारोपण

28 July 2022 Teli samaj 86 views

पुरवठा निरीक्षक हर्षाताई महाजन यांच्या हस्ते वृक्षारोपण

     धुळे - महाराष्ट्र प्रांतिक तैलिक महासभा धुळे जिल्हा महिला आघाडीच्या वतीने वन संवर्धन दिनानिमित्त शनिवार दि. २३ जुलै २०२२ रोजी संध्याकाळी ४ वाजता धुळे शहरातील एकविरा देवी मंदीरासमोर भक्त निवास येथे तेली समाजाच्या महिलांच्या वतीने ३०० वृक्ष लावण्याचा संकल्प करण्यात आला तसेच यावेळी प्रातिनिधीक स्वरुपात जाळ्या व रोपे तेली समाजातील  पुरवठा निरीक्षक हर्षाताई महाजन यांच्या हस्ते वृक्षारोपण व मान्यवर महिलांच्या हस्ते आज रोपे लावण्यात आली. तेली समाजाचे घर तेथे वृक्षारोपण करण्याचे आवाहन करण्यात आले. तेली समाजातील महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.

Maharashtra prantik tailik Mahasabha mahila aghadi vriksharopan

     यावेळी विविध विषयांवर चर्चा करण्यात आली लवकरच सर्व समावेशक धुळे जिल्हा व धुळे महानगर कार्यकारिणी तयार करण्यात येणार आहे. याकरिता इच्छुक महिलांनी छायाताई करनकाळ मो.नं. ८२०८९६०८८३ संपर्क साधावा. वनसंवर्धन कार्यक्रमासाठी महाराष्ट्र प्रांतिक तैलिक महासभा विभागीय कार्याध्यक्ष सौ. वैशाली नरेंद्र चौधरी, जिल्हा उपाध्यक्ष छायाताई कल्याण करनकाळ, सौ. दिपाली तुषार चौधरी, सौ. नलिनी करनकाळ,  सौ. शोभाताई थोरात, सौ. आशा चौधरी, सौ. सरोज चौधरी, सौ. वर्षा चौधरी, सौ. हेमलता चौधरी, सौ. मनिषा चौधरी, सौ संजना चौधरी सौ निरंजनी ताई चौधरी सौ दिपा चौधरी सौ राधा चौधरी सौ कल्याणी चौधरी सौ उषा चौधरी सौ पुनम चौधरी सौ संगीता ताई चौधरी सौ भारती चौधरी मिराताई चौधरी यांनी नियोजन केले.

tailik Mahasabha mahila aghadi vriksharopan

Teli Samaj mahila aghadi vriksharopan

Teli Samaj mahila aghadi

 

Share:

📺 संबंधित व्हिडिओ:

▶️
Click to load video
YouTube Thumbnail

नामदेवे रचिला पाया तुका झालासे कळस … शाहिर संभाजी भगत