वधु - वर फॉर्म

खान्देश तेली समाज मंडळाच्या वतीने अंगणवाडी केंद्रात बालकांना आहार व शालेय साहित्य वाटप

08 August 2022 Teli samaj 53 views

    जामनेर - येथील खान्देश तेली समाज मंडळ महिला आघाडीच्या शहराध्यक्ष सौ. प्रणाली चौधरी व निदान लॅबचे संचालक श्री सुबोध चौधरी यांची मुलगी कु. दिया हिच्या पाचव्या वाढदिवसाच्या निमित्ताने जामनेर शहरातील भिल वस्तीतील अंगणवाडी केंद्रामध्ये असलेल्या कुपोषित बालकांना त्यांचे वजन पूर्ण होईपर्यंत आहार वाटप करण्याचा संकल्प केला होता. त्या आहाराचे वाटप आज करण्यात आले. त्याच सोबत त्याच केंद्रातील विद्यार्थ्यांना शालेय साहित्य वाटप करण्यात आले.

Distribution of food and school materials to children in Anganwadi center on behalf of Khandesh Teli Samaj Mandal     यावेळी अंगणवाडी सेविका श्रीमती सुनंदा वाघ, श्रीमती कल्पना बाविस्कर, श्रीमती निशाताई तेली तसेच खान्देश तेली समाज मंडळाचे पदाधिकारी श्रीमती स्वाती चौधरी,सौ. प्रणाली चौधरी, तालुका अध्यक्ष अजय चौधरी, शहराध्यक्ष निलेश चौधरी, रामेश्वर पाटील, वासुदेव चौधरी, विलास चौधरी, संतोष भोलाणे, कल्पेश चौधरी ,मुकेश जाधव, दत्तात्रय पाटील, तेजस चौधरी, दीपक भोलाणे, निखिल बोलाणे यांच्यासह अनेक पदाधिकारी व शाळेतील विद्यार्थी उपस्थित होते.

Khandesh Teli Samaj Mandal Distribution of food and school materials to children in Anganwadi center

शेयर करा:

📺 संबंधित व्हिडिओ:

▶️
Click to load video
YouTube Thumbnail

Teli Samaj amravati Gun Gaurav sanskritik samaroh