महाराष्ट्र प्रांतिक तैलिक महासभा आयोजित तेली समाजाच्या वतीने भाजप प्रदेशाध्यक्ष आ. चंद्रशेखर बावनकुळे यांचा धुळ्यात दि. १२ रोजी जाहीर सत्कार व सामाजिक संवाद कार्यक्रम
05 September 2022 Teli samaj 58 views
धुळे - भारतीय जनता पक्षाच्या प्रदेश अध्यक्ष पदी माजी विज मंत्री, आमदार चंद्रशेखर बावनकळे यांची नुकतीच निवड झाली. त्यांचा महाराष्ट्र प्रांतिक तैलिक महासभा आयोजित तेली समाजाच्या वतीने जाहिर सत्कार व सामाजिक संवादाचा कार्यक्रम सोमवार दि. १२ सप्टेंबर २०२२ रोजी धळे शहरात होणार आहे तरी तेली समाज बंधु - भगिनींनी मोठ्या संख्येने उपस्थित रहावे असे आवाहन महाराष्ट्र प्रांतिक तैलिक महासभेच्या वतीने करण्यात आले आहे.
भारतीय जनता पक्षाचे प्रदेश अध्यक्ष माजी विज मंत्री, आमदार चंद्रशेखर बावनकुळे यांचा तेली समाजाच्या वतीने जाहिर सत्कार व सामाजिक संवाद कार्यक्र माबाबत रुपरेषा ठरविण्यासाठी दि.१ सप्टेंबर रोजी बैठक आयोजित करण्यात आली असून प्रदेश अध्यक्ष आ.चंद्रशेखर बावनकुळे तेली समाजाचे भूषण असून समाजातील व्यक्तीला सत्ताधारी पक्षा प्रदेश अध्यक्ष पद मिळणे समाजासाठी भूषणावह बाब आहे. यामुळे नाशिकसह धुळे शहरात तेली समाजाच्या वतीने जाहीर सत्कार व्हावा ही भावना होती याच अनुषंगाने महाराष्ट्र प्रातिक तैलिक महासभा प्रदेश अध्यक्ष खासदार रामदास तडस, प्रदेश महासचिव डॉ. भूषण कर्डिले, कोषाध्यक्ष गजानन शेलार, उपाध्यक्ष बबन चौधरी, समन्वयक सुनिल चौधरी, युवा आघाडी प्रदेश महासचिव नरेंद्र चौधरी या संघटनेचे राज्य पदाधिकारी शिष्टमंडळाने नागपूर येथे भेट घेवून नाशिक विभागात दि . ११ सप्टेंबर २०२२ रोजी नाशिक, दि. १२ सप्टेंबर २०२२ धुळे व दि . १३ सप्टेंबर २०२२ नंदुरबार असा तीन दिवशीय दौरा करण्याची विनंती केली होती त्यानुसार त्यांनी समाजाशी सामाजिक संवाद साधणार असल्याचे कळविले आहे. तरी सदर कार्यक्रमांस व बैठकीस मोठ्या संख्येने समाज बांधवांनी उपस्थित रहावे असे आवाहन महाराष्ट्र प्रांतिक तैलिक महासभा सर्व आघाडी पदाधिकारी यांनी केले आहे.
शेयर करा:
📺 संबंधित व्हिडिओ:
▶️
Click to load video
तेली समाज उत्पत्ति के तीन सिद्धांत - तेली समाज इतिहास | Teli Samaj Caste History | Teli Kshatriya