वधू - वर फॉर्म

खान्देश तेली समाज मंडळाचे शहराध्यक्ष राजेंद्र चौधरी यांची स्तुत्य निवड

07 September 2022 Teli samaj 103 views

     धुळे - खान्देश तेली समाज मंडळाचे धुळे शहराध्यक्ष श्री राजेंद्र भटू चौधरी यांचे राष्ट्रीय ओबीसी महासंघाच्या उत्तर महाराष्ट्र विभागीय युवा अध्यक्षपदी निवड करण्यात आलेली आहे. राष्ट्रीय युवा अध्यक्ष श्री सुभाषजी घाटे यांनी त्यांना नियुक्तीपत्र दिले असून ओबीसी महासंघामध्ये त्यांचे शहराध्यक्ष पदावरून केलेल्या उत्कृष्ट कार्याबद्दल त्यांना उत्तर महाराष्ट्राची संपूर्ण जबाबदारी देण्यात आल्याचे त्यांनी कळवले आहे. श्री राजेंद्र चौधरी यांच्या झालेल्या निवडीबद्दल त्यांचे खान्देश तेली समाज मंडळाचे अध्यक्ष कैलास आधार चौधरी, सचिव रवींद्र जयराम चौधरी, कार्याध्यक्ष मनोज मधुकर चौधरी, उपाध्यक्ष जयवंत रामदास चौधरी, अमोल हिरामण चौधरी, धुळे तालुका अध्यक्ष भटू पुंडलीक चौधरी, राकेश पुंडलिक चौधरी, चंद्रकांत श्रीराम चौधरी महिला आघाडीच्या विभागीय अध्यक्ष सौ. मालती सुनील चौधरी,धुळे जिल्हाध्यक्ष सौ, कल्पना अशोक चौधरी, सचिव सौ. सविता प्रताप चौधरी,धुळे शहर सचिव सौ, प्रतिभा चौधरी, सौ, भारती चौधरी, सौ. समिधा सूर्यवंशी, सौ.रिटा बागुल, सौ. वंदना चौधरी व सर्व पदाधिकारींनी त्यांचे कौतुक करून अभिनंदन केलेले आहे.

Share:

📺 संबंधित व्हिडिओ:

▶️
Click to load video
YouTube Thumbnail

teli ghana kohlu