Bride / Groom Form

कोरेगाव तालुका तिळवण तेली समाजाच्या वतीने आमदार श्री महेशजी शिंदे यांची भेट

07 September 2022 Teli samaj 107 views

     कोरेगाव तालुका तिळवण तेली समाजाच्या वतीने आज कोरेगाव येथे मा. आमदार श्री महेशजी शिंदे, कोरेगाव - खटाव - सातारा यांची कोरेगाव येथे शासकीय विश्रामगृहात समक्ष भेट घेतली समाजाची गेल्या काही वर्षापासूनची प्रमुख मागणी समाज मंदिरा साठी जागा व सभामंडप या दोन गोष्टी आमदार साहेबांपुढे मांडल्या गेल्‍या.  यावर त्‍यांनी  लवकरच सातारा जिल्ह्याचे सुपुत्र व राज्याचे मा. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब यांच्या माध्यमातून  २५ लक्ष रुपये भरीव निधिचे तसेच जागेसाठीच्या तरतुदी चे आश्वासन दिले आहे. सदर वेळी आपल्या समाजाचे समाज बांधव माजी अध्यक्ष श्री अनिल क्षिरसागर, श्री अनिल भोज, श्री आनंदराव  दळवी, कोरेगाव नगरसेवक श्री सागर वीरकर,  श्री राजेश वीरकर, मा. नगरसेवक श्री निवास मेरुकर, श्री तानाजी चतुर, श्री अनिल वीरकर, श्री अरविंद वीरकर, श्री दिपक वीरकर हे सर्व समाज बांधव उपस्थित होते.

koregaon taluka tilvan Teli Samaj

Share:

📺 संबंधित व्हिडिओ:

▶️
Click to load video
YouTube Thumbnail

तेल घाणी, तेल घाणा