कल्पेश बावनकुळेच्या हत्याऱ्यांना ४८ तासांत अटक करा अन्यथा तीव्र आंदोलन - संताजी ब्रिगेड व तेली समाज महासभेचा इशारा.
शिवसेना रामटेक माजी खासदार प्रकाश जाधव - संताजी ब्रिगेडची सीसीटीव्ही कॅमरे, पोलिस चौकीची मागणी
कन्हान - कल्पेश बावनकुळे या युवकाच्या हत्याऱ्यांना ४८ तासांच्या आत अटक करून कन्हान व ग्रामिण भागात रात्रीची गस्त आणि नागपुर बॉयपास महामार्गावरील बोरडा रोड चौकात पोलीस चौकी व सीसीटीव्ही कॅमरे त्वरित लावावे, अन्यथा तीव्र आंदोलन करण्यात येईल, असा इशारा शिवसेना रामटेक माजी खासदार प्रकाश भाऊ जाधव यांच्या नेतृत्त्वात शिवसेना, संताजी ब्रिगेड, तेली समाज महासभा प्रदेश उपाध्यक्ष महेंद्र भुरे व शिष्टमंडळाने उपविभागीय पोलीस अधिकारी मुख्तार बागवान यांना बुधवारी निवेदनातून दिला आहे.
शिष्टमंडळात माजी खासदार प्रकाश जाधव, प्रेम रोडेकर, दिलीप राईकवार, प्रभाकर बावने, रूपेश सातपुते, पुरुषोत्तम येनेकर, गोविंद जुनघरे, नरेंद्र खडसे, प्रविण गोडे, अनिल ठाकरे, ललूण कुशवाह, मनोज मेश्राम, बल्ला यादव, विजय बोरकर, संताजी ब्रिगेड तेली समाज महासभा महाराष्ट्र राज्याचे प्रदेश उपाध्यक्ष नरेश भोंदे, रवि घावडे, विजय बावनकुळे, सुरेश पारधी, प्रभाकर सावरकर, नंदु घावडे, प्रमोद देशमुख, शुभम घावडे, विठ्ठल बावनकुळे, दिलिप देशमुख, मोहन धांडे, अनिल बारई, आशिष बावनकुळे, नितीन लेंडे आदी उपस्थित होते.
दरम्यान, उपविभागीय पोलिस अधिकारी बागवान यांनी रात्रीची गस्त आजपासून सुरू करण्याची हमी दिली तसेच बोरडाचौकात सीसीटीव्ही कॅमेरे आणि चौकी सुरू करण्याबाबत वरिष्ठ अधिकाऱ्यांशी चर्चा करण्यात येईल आणि कल्पेशच्या हत्याऱ्यांना लवकरात लवकर शोध करून अटक करण्याचे आश्वासन शिष्टमंडळाला दिले.
