वधु - वर फॉर्म

पुणे तिळवण तेली समाजातर्फे बावनकुळे यांचा सत्कार

20 September 2022 Rathod Teli Sahu Samaj 37 views

     बिबवेवाडी, दि. १८ - भाजपच्या प्रदेशाध्यक्षपदी निवड झाल्याबद्द ल चंद्रशेखर बावनकुळे यांचा पुणे तिळवण तेली समाजातर्फे नागरी सत्कार करण्यात आला. ज्ञानज्योती सावित्रीबाई सभागृह टिंबर मार्केट येथे हा सोहळा पार पडला. यावेळी घनश्याम वाळंजकर, प्रकाश कर्डिले, उमेश किरवे यांच्या नेतृत्वाखाली हा कार्यक्रम झाला. यावेळी आमदार सिद्धार्थ शिरोळे, माजी आमदार योगेश टिळेकर, भाजप शहराध्यक्ष जगदीश मुळीक, दीपक मिसाळ, दत्ताजी खाडे अनेक मान्यवर उपस्थित होते. दरम्यान, समाजाची मातृसंस्था असलेली भवानी पेठेतील तिळवण तेली समाज वास्तू बांधकामासाठी शासनाकडून भरीव मदत मिळवून देऊ, असे आश्वासन बावनकुळे यांनी दिले.

Pune Tilvan Teli Samaj Chandrashekhar Bawankule Samaj Satkar      कार्यक्रमासाठी प्रवीण बारमुख, संताजी महाराज पालखी सोहळा सर्व पदाधिकारी, चंद्रकांत वाव्हळ, प्रिया महिंद्रे, निशा करपे, कमल सुपेकर, संदीप नाना चिलेकर, विजय रत्नपारखी, सचिन काळे, रोहिदास उबाळे, विजयकुमार शिंदे, पंडित पिंगळे, रोहिदास हाडके, लक्ष्मण हाडके, सुधीर वाळंजकर, संतोष माकुडे, संजय नगिने, महेश देशमाने, प्रकाश गिधे, अविनाश कहाणे, राजेश शेजवळ, रविकुमार शिंदे, भरत फल्ले, राजू तेली, चंद्रकांत धोत्रे, राकेश धोत्रे, अनेक कार्यकर्ते उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन गणेश चव्हाण व सचिन नगिने यांनी, तर आभार घनश्याम वाळुजकर यांनी मानले.

शेयर करा:

📺 संबंधित व्हिडिओ:

▶️
Click to load video
YouTube Thumbnail

भक्त शिरोमणि माँ कर्माबाई का जीवन परिचय | Biography of Maa Karma Bai | Maa Karma Devi Story