वधू - वर फॉर्म

नंदुरबार प्रदेश तेली महासंघा वतीने मा.आ. चंद्रशेखर बावनकुळे यांचा सत्‍कार

20 September 2022 Teli samaj 112 views

     भाजपा महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष तथा तेली समाजाचे नेते मा. आ. श्री.चंद्रशेखर बावनकुळे साहेब दिनांक 13 सप्टेंबर 2022 रोजी नंदुरबार जिल्हा दौऱ्यावर असताना त्यांच्या प्रमुख उपस्थितीत व तेली समाजाचे ज्येष्ठ नेते काकासाहेब हिरालाल चौधरी यांच्या अध्यक्षतेखाली प्रदेश तेली महासंघ नंदुरबार जिल्ह्याची बैठक छत्रपती शिवाजी महाराज नाट्यमंदिर येथे संपन्न झाली. याप्रसंगी समाज बांधव भगिनींना मार्गदर्शन करताना मा.आ.श्री.चंद्रशेखर बावनकुळे साहेब, आदिवासी विकास मंत्री मा.ना.डॉ. विजयकुमार गावित साहेब, प्रदेश तेली महासंघ प्रदेशाध्यक्ष तथा भाजपा जिल्हाध्यक्ष विजय भाऊ चौधरी, मा.आ.शिरीष दादा चौधरी, हिरा उद्योग समूहाचे चेअरमन डॉ.रवींद्रबापू चौधरी याप्रसंगी व्यासपीठावर संघटन सचिव अशोक चौधरी, तेरी महासंघ जिल्हाध्यक्ष संदीप चौधरी, तेली महासंघ उपाध्यक्ष भरत चौधरी, सुभाष चौधरी, सौ अनिताताई चौधरी, सौ रेखाताई चौधरी, सौ उमा चौधरी आदी मान्यवर. याप्रसंगी समाज बांधव भगिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

On behalf of Nandurbar Pradesh Teli Mahasangha Reception of Chandrasekhar Bawankule

Share:

📺 संबंधित व्हिडिओ:

▶️
Click to load video
YouTube Thumbnail

भक्त शिरोमणि माँ कर्माबाई का जीवन परिचय | Biography of Maa Karma Bai | Maa Karma Devi Story