वधु - वर फॉर्म

महाराष्ट्र प्रदेश तेली महिला महासंघाची नुतन कार्यकारिणी जाहीर जिल्हाध्यक्षपदी रुपाली महाले तर महानगर अध्यक्षपदी कविता अहिरराव यांची निवड

20 September 2022 Teli samaj 13 views

     महाराष्ट्र प्रदेश तेली महिला महासंघाच्या धुळे जिल्हा बैठकित धुळे जिल्हाध्यक्ष पदी सौ रुपाली विजय महाले आणि धुळे महानगर अध्यक्ष पदी सौ कविता ईश्वर अहिरराव यांची नियुक्ती करून धुळे जिल्हा आणि धुळे महानगर नूतन कार्यकारणी जाहीर करण्यात आली दि. १५ रोजी प्रदेश तेली महासंघाच्या महाराष्ट्र सह प्रभारी सौ प्रतिभाताई चौधरी यांच्या निवासस्थानी सदर प्रदेश तेली महिला महासंघाची बैठक संपन्न झाली.

Maharashtra Pradesh teli Mahila mahasangh Dhule karyakarini jahir      यावेळी प्रदेश तेली महासंघाच्या महाराष्ट्र सह प्रभारी सौ प्रतिभाताई चौधरी आणि प्रदेश तेली महासंघाच्या महाराष्ट्र कार्याध्यक्षा सौ जयश्रीताई अहिरराव यांच्या मार्गदर्शनाखाली सदर बैठक घेण्यात आली.यात प्रदेश तेली महिला महासंघाच्या धुळे जिल्हाध्यक्ष पदी सौ रुपाली विजय महाले आणि धुळे महानगर अध्यक्ष पदी सौ कविता ईश्वर अहिरराव यांच्या सह धुळे जिल्हा आणि धुळे महानगर नूतन कार्यकारिणीची नियुक्ती जाहीर करून संपूर्ण वर्षभरात राबविण्यात येणारे वेगवेगळे कार्यक्रमांचे नियोजन ही करण्यात आले. प्रदेश तेली महासंघाच्या वतीने सर्व महिलांनी सामाजिक सांस्कृतिक उपक्रमात आपला सहभाग वाढवावा तसेच तेली समाजातील इतर महिलांना देखील आपल्या सोबत घेऊन समाज उपयोगी वेगवेगळ्या कार्यक्रमांचे आयोजन करावे असा संकल्प केला.यावेळी धुळे जिल्हा आणि धुळे महानगर अश्या प्रदेश तेली महिला महासंघाच्या नूतन कार्यकारिणीची निवड करण्यात आली.यावेळी धुळे जिल्हाध्यक्ष सौ रूपाली विजय महाले यांनी शिरपूर तालुका अध्यक्षपदी सौ माधुरी विठोबा चौधरी तर शिंदखेडा अध्यक्षपदी सौ शकुंतला लोटण चौधरी, धुळे तालुका अध्यक्षपदी सौ वंदना संजय चौधरी, जिल्हा सचिव सौ भारती यतिन चौधरी, सहसचिव सौ दीपिका युवराज चौधरी,जि. उपाध्यक्ष सौ पुष्पाताई बोरसे नगरसेविका,सौ भारती अनिल अहिरराव, सौ ललिता किशोर चौधरी, सौ वैशाली ज्ञानेश्वर चौधरी,सौ ललिता विनोद थोरात निवड करण्यात आली. तसेच प्रदेश तेली महासंघाच्या धुळे महानगर अध्यक्ष सौ कविता ईश्वर अहिरराव यांनी कार्याध्यक्ष सौ मीनाक्षी विनय बोरसे, उपाध्यक्ष सौ प्रियंका अमोल चौधरी,सौ भावना पंकज चौधरी, सौ सुनिता प्रभाकर चौधरी,सौ नुतन गिरीश भामरे, सचिव सौ प्राजक्ता सागर चौधरी, सहसचिव सौ तेजल सागर चौधरी, सांस्कृतिक प्रमुख सौ कमल विशाल महाले, प्रसिद्धी प्रमुख सौ दीपिका नैनेश जाधव, सहप्रसिद्धि प्रमुख सौ निकिता शशिकांत जाधव संघटन प्रमुख सौ अनिता कुंदन चौधरी,सौ गायत्री अजय जाधव,सौ पुनम मुकेश चौधरी,सौ भारती मिलिंद बोरसे, सौ पूजा मिलिंद महाले,सौ खुशी शशांक महाले,सौ संध्या संतोष चौधरी,सौ कविता संजय चौधरी,सौ रामेश्वरी जयप्रकाश महाले,सौ सुवर्णा बिनोद चौधरी अशी नवीन कार्यकारणी जाहीर करण्यात आली. यावेळी प्रदेश तेली महिला महासंघाच्या नूतन कार्यकारिणीचे अभिनंदन करण्यात आले.धुळे भाजपा जिल्हा उपाध्यक्ष प्रा. सागर चौधरी सर यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देण्यात आल्या व अभियंता दिनाच्या निमित्ताने इंजी कु मोनाली चौधरी यांचा सन्मान करण्यात आला. सदर बैठकीसाठी प्रदेश तेली महासंघाच्या महाराष्ट्र सह प्रभारी सौ प्रतिभाताई चौधरी जेष्ठ नगरसेविका, कार्याध्यक्ष माजी महापौर जयश्रीताई अहिरराव, विभागीय उपाध्यक्ष सौ आरती ताई महाले, जेष्ठ सल्लागार श्रीमती वीणाताई चौधरी, सौ अलकाताई चौधरी,सौ सुलोचना चौधरी श्रीमती आशा अजय चौधरी,सौ रेखा योगेंद्र थोरात यांच्यासह इतर महिला भगिनी मोठ्या संख्येने उपस्थित होत्या. यावेळी या बैठकीचे आयोजक आणि नियोजक प्रदेश तेली महासंघाच्या धुळे जिल्हाध्यक्ष सौ.रूपाली विजय महाले ब धुळे महानगर शहराध्यक्ष सौ कविता ईश्वर अहिरराव यांनी सर्वांचे आभार मानले.याप्रमाणे प्रदेश तेली महासंघाची धुळे जिल्हा बैठक संपन्न झाली असे जाहीर करण्यात आले.

शेयर करा:

📺 संबंधित व्हिडिओ:

▶️
Click to load video
YouTube Thumbnail

UGC Bill Controversy: मोदी जी और तेली समाज पर 'षड्यंत्र' की सच्चाई ?