जालना शहर तेली समाज गुणवंत विद्यार्थ्यांचा भव्य सत्कार सोहळा - २०२२
श्री संत संताजी बहुद्देशीय सेवाभावी संस्था, जालना तर्फे आयोजित सन - २०२२ गुणवंत विद्यार्थ्यांचा भव्य सत्कार सोहळा "गुणवंताच्या पाठीवर थाप कौतुकाची" दिनांक 0८ ऑक्टोबर २०२२ वार : शनिवार दुपारी : ०३.00 वाजता स्थळ : श्री संताजी मंगल कार्यालय,गायत्री नगर, जालना जालना शहर तेली समाजातील सर्व सन्माननिय समाज बांधव, भगीनी यांना कळविण्यात आले आहे की, या वर्षी आपल्या समाजातील जालना शहरातील गुणवंत विद्यार्थ्यांना प्रोत्साहन देण्यासाठी व पुढील यशस्वी वाटचालीसाठी त्यांना नवी दिशा मिळावी, त्यांच्या पाठीशी सर्व समाज असुन उज्वल भविष्यासाठी त्यांना समाजातर्फे प्रेरणा मिळावी, समाजाने आपले कौतुक केल्याने आपणही समाजाचे काही देणे लागतो, ही भावना त्यांच्यामध्ये निर्मान व्हावी पर्यायाने सामाजिक उत्कर्षासाठी प्रत्येक समाज बांधवांचा हातभार लागावा. या निस्वार्थी भावनेने १० वी, १२ वी, पदवी, पदविका, पदव्युत्तर पदवी, JEE,NEET,TET,MHT-CET (सर्व अंतिम वर्ष उत्तीर्ण सन-२०२२ मध्ये) यामाध्ये ६०% पेक्षा जास्त गुण प्राप्त करण्याऱ्या गुणवंत विद्यार्थ्यांचा समाजातर्फे भव्य सत्कार सोहळा दि. ०८ आक्टोबर २०२२ रोजी श्री संताजी मंगल कार्यालय, गायत्री नगर,जालना येथे दुपारी ०३.०० वा. आयोजित करण्यात आला आहे.
