Bride / Groom Form

खान्देश तेली समाज मंडळ महिला आघाडी वतीने कुमारीका पूजन कार्यक्रम

07 October 2022 Teli samaj 94 views

खान्देश तेली समाज मंडळ महिला आघाडीचा अभिनव उपक्रम ललिता पंचमीच्या मुहूर्तावर केले कुमारीका पूजन, गोरगरीब महिलांना साड्यांचे वाटप

     धुळे - संपूर्ण महाराष्ट्रभर नावलौकिक प्राप्त असलेली तेली समाजातील खान्देश तेली समाज मंडळ या संस्थेच्या महिला आघाडीच्या वतीने आज श्री क्षेत्र नागाई ता. साक्री. जि. धुळे येथील नागाई देवीच्या मंदिरामध्ये नवरात्र उत्सवाच्या निमित्ताने ललिता पंचमीचे औचित्य साधून पाचवी माळच्या दिवशी कुमारिका पूजन करण्यात आले तसेच परिसरातील गोरगरीब महिलांना साड्यांचे वाटप करण्यात आले.

Khandesh Teli Samaj Mandal Mahila aghadi Kumari ka Pujan karykram     नागाई क्षेत्र येथील आदिवासी वस्तीतील सर्व गोरगरीब महिलांना महिला आघाडीच्या वतीने ओटी भरून साड्या वाटप करण्यात आले तर कुमारिकांचे सर्व शृंगार देऊन पूजन करण्यात आले.

Khandesh Teli Samaj Mandal Mahila aghadi karykram     यावेळी खान्देश तेली समाज महिला आघाडीच्या विभागीय अध्यक्ष सौ. मालती सुनील चौधरी, धुळे जिल्हाध्यक्ष सौ.कल्पना अशोक चौधरी, सचिव सौ. सविता प्रताप चौधरी, उपाध्यक्ष सौ. समिधा सूर्यवंशी, संघटक सौ. भारती कैलास चौधरी, सल्लागार सौ. भारती भागवत चौधरी, श्रीमती लताताई संतोष चौधरी, धुळे शहर सचिव सौ. प्रतिभा चौधरी, उपाध्यक्ष सौ. मनीषा संजय चौधरी, सौ.शोभा गणेश चौधरी यांच्यासह अनेक महिला पदाधिकारी उपस्थित होत्या.

Khandesh Teli Samaj Mandal Mahila aghadi

Share:

📺 संबंधित व्हिडिओ:

▶️
Click to load video
YouTube Thumbnail

Delhi Sahu Rathore samaj yuvak yuvati parichay sammelan & pratibha samman samaroh