वधु - वर फॉर्म

अहमदनगर जिल्हा तेली समाज राज्यस्तरीय वधु - वर पालक मेळावा शिर्डी वधू वर फॉर्म 2022 चे मान्यवरांच्या हस्ते उद्घाटन

13 October 2022 teli samaj vadhu var melava 52 views

     दि. 11. डिसेंबर 2022 रोजी शिर्डी येथे आयोजित करण्यात आलेल्या राज्यस्तरीय वधू वर पालक मेळावा शिर्डी 2022 च्या वधू वर अर्जाचे भारतीय तैलिक साहु राठोड महासभाचे संस्थापक अध्यक्ष व माजी खासदार मा श्री रामनारायन बाबूजी  साहू, राष्ट्रीय अध्यक्ष मा श्री डॉ उमेश जी साहू, Ahmednagar Jilha teli Samaj rajyastariya Vadhu var Palak Parichay melava Shirdi Vadhu var form 2022 udghatan उत्तर प्रदेश आरोग्य मंत्री नामदार मा श्री राकेश जी राठोड, भारतीय जनता पार्टी ओबीसी मोर्चा राष्ट्रीय उपाध्यक्ष व खासदार मा श्री संगमलाल जी गुप्ता,खासदार मा श्री चंदूलाल जी साहू,  उत्तर प्रदेश मुख्यमंत्री मा योगीजी यांचे मठाधिकारी व राजनेतीक सहकारी आमदार मा श्री स्वामी संपूर्णानंद जी , महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष मा श्री रतीलाल गुप्ता जी, राष्ट्रीय युवक आघाडीचे श्री एस पी गुप्ता जी ,राष्ट्रीय महिला अध्यक्ष व आमदार तसेच सुप्रीम कोर्टाच्या सुप्रसिद्ध वकील अॅड.मानसी जी गुप्ता, महाराष्ट्र राज्य अध्यक्ष सौ मालती ताई जगनाडे, राष्ट्रीय सरचिटणीस सौ मंजुताई कारेमोरे, राष्ट्रीय उपाध्यक्ष सौ सुनीता ताई मेहेर आदी प्रमुख पदाधिकारी बंधु व भगिनींच्या उपस्थितीत फाॅर्मचे अधिकृत उदघाटन मान्यवरांच्या हस्ते मोठ्या थाटात करण्यात आले.

teli Samaj rajyastariya Vadhu var Palak Parichay melava Shirdi Vadhu var form 2022 udghatan     संपुर्ण देशभरातून आलेल्या विविध राज्यातील समाज बांधवांना शिर्डी येथे होणाऱ्या वधू वर मेळाव्याचे अर्जाचे वाटप यावेळी करण्यात आले , मा श्री राष्ट्रीय संस्थापक अध्यक्ष खासदार श्री राम नारायण बाबूजी  साहू यांनी सदरील उपक्रमाचे मनोभावे कौतुक केले व शुभेच्छा दिल्या त्यांचा समस्त अहमदनगर जिल्हा तेली समाजाचे वतीने सत्कार करण्यात आला, या माध्यमातून शिर्डी येथे होणारा वधू वर मेळावा राज्यातच नव्हे तर देशात पोहचला यावेळी अहमदनगर जिल्हा तेली समाज महासभेचे राज्यस्तरीय वधु वर परिचय मेळावा शिर्डी 2022 समितीचे ज्येष्ठ समाजसेवक श्री. सुधाकर शेठ बनसोडे, श्री. सुरेशराव नागले साहेब, श्री.मुकुंदराव बनसोडे, अॅड. श्री. विक्रांत वाघचौरे, श्री. सचिनशेठ लोखंडे, श्री.बद्रीनाथ लोखंडे, श्री. दिपकराव चौधरी, आदी उपस्थित होते.

Ahmednagar teli Samaj rajyastariya Vadhu var Palak Parichay melava Shirdi Vadhu var form 2022 udghatan

शेयर करा:

📺 संबंधित व्हिडिओ:

▶️
Click to load video
YouTube Thumbnail

Madhya Pradesh tailik Sahu Mahasabha mahila sammelan