Bride / Groom Form

खान्देश तेली समाज मंडळ आयोजित वधु - वर परिचय मेळाव्याच्या जागेचे भूमिपूजन संपन्न

09 November 2022 teli samaj vadhu var melava 98 views

     धुळे - खान्देश तेली समाज मंडळ धुळे आयोजित राज्यस्तरीय वधू - वर परिचय मेळावा रविवार दिनांक १३ नोव्हेंबर २०२२ रोजी स्व. दत्तात्रय लालचंद महाले नगर, पाडवी नूतन विद्यालयाचे मैदान, स्टेशन रोड, धुळे या ठिकाणी सकाळी १० वाजता संपन्न होणार असून या मेळाव्यासाठी दीड हजार वधू-वरांची नोंदणी झालेली आहे. महाराष्ट्र राज्यभरातून तसेच शेजारचे मध्य प्रदेश, गुजरात राज्या मधून वधू-वरांनी नोंदणी केलेली असून संपूर्ण राज्यभरातून जवळ - जवळ सात ते आठ हजार समाजसेवक बंधू-भगिनी या मेळाव्यासाठी उपस्थित राहतील अशी माहिती मंडळाचे सचिव रवींद्र जयराम चौधरी यांनी दिली.

Khandesh teli Samaj Mandal aayojit vadhu var parichay melava Jaga Bhumi Pujan samarambh      या मेळाव्यामध्ये चहा, नाश्ता, उसाचा रस ,जेवण, पिण्याचे पाणी ही सर्व व्यवस्था मोफत करण्यात आलेली असून यासाठी कोणत्याही प्रकारचे शुल्क आकारण्यात आलेले नाही असेही त्यांनी सांगितले या मेळाव्याच्या मंडपाचे भूमिपूजन सोमवार दिनांक सात रोजी सायंकाळी नूतन हायस्कूलच्या मैदानावर भाजपाचे राज्य उपाध्यक्ष मा. श्री बबनरावजी चौधरी यांच्या हस्ते श्रीफळ वाढवून करण्यात आले. यावेळी मनपाचे माजी स्थायी समिती सभापती सतीश तात्या महाले, नगरसेविका सौ. प्रतिभाताई चौधरी, नगरसेवक नरेश आप्पा चौधरी, मोतीलाल शेठ चौधरी, अनिल नाना अहिरराव, कापडणे ग्रामपंचायत सदस्य हिम्मतराव चौधरी, सुभाष जाधव बापू,पोपटराव चौधरी, हिरुआप्पा चौधरी यांचे सह अनेक मान्यवर उपस्थित होते.

Khandesh teli Samaj Mandal aayojit vadhu var parichay melava Jaga Bhumi Pujan      यावेळी बबनरावजी चौधरी यांनी कार्यक्रमाला शुभेच्छा देऊन सर्व समाजाला उपस्थित राहण्याचे आवाहन केले. मंडळाचे अध्यक्ष कैलास आधार चौधरी, सचिव रवींद्र जयराम चौधरी, कार्याध्यक्ष मनोज मधुकर चौधरी ,उपाध्यक्ष जयवंत रामदास चौधरी ,शहराध्यक्ष राजेंद्र भटू चौधरी , चंद्रकांत श्रीराम चौधरी, धुळे तालुकाध्यक्ष भटूआप्पा चौधरी, सचिव पंकज चौधरी, युवक आघाडीचे जिल्हाध्यक्ष सुनील भाऊ चौधरी, योगेश चौधरी लोणखेडी, नंदू चौधरी शिरुड भाऊसाहेब चौधरी वरखेडी, योगेंद्र थोरात, अमोल हिरामण चौधरी , डॉ.सोमनाथ चौधरी,कमलेश चौधरी,महिला आघाडीच्या विभागीय अध्यक्ष सौ मालती चौधरी, सचिव सौ.सविता चौधरी,सौ. भारती भागवत चौधरी,सौ.भारती सोमनाथ चौधरी,सौ.भारती कैलास चौधरी सौ. समिधा सूर्यवंशी,सौ.रिटा बागूल, श्रीमती लताताई चौधरी, विलास बळीराम चौधरी, पप्पू शेठ अहिरराव, किशोर चौधरी,चेतन चौधरी, भागवत चौधरी यांच्यासह समाजातील अनेक मान्यवर समाजसेवक बंधू-भगिनी उपस्थित होते.

Khandesh teli Samaj Mandal aayojit vadhu var parichay melava Bhumi Pujan samarambh

Share:

📺 संबंधित व्हिडिओ:

▶️
Click to load video
YouTube Thumbnail

indian Republic Day with army & Sahu samaj