वधु - वर फॉर्म

तेली समाजाचा राज्यस्तरीय वधु - वर परिचय मेळावा - खान्देश तेली समाज मंडळाचे आयोजन

13 November 2022 teli samaj vadhu var melava 72 views

    धुळे - खान्देश तेली समाज मंडळ धुळे आयोजित राज्यस्तरीय वधू - वर परिचय मेळावा रविवार दिनांक १३ नोव्हेंबर २०२२ रोजी स्व. दत्तात्रय लालचंद महाले नगर, पाडवी नूतन विद्यालयाचे मैदान, स्टेशन रोड, धुळे या ठिकाणी सकाळी १० वाजता संपन्न होणार असून या मेळाव्यासाठी दीड हजार वधू-वरांची नोंदणी झालेली आहे. महाराष्ट्र राज्यभरातून तसेच शेजारचे मध्य प्रदेश, गुजरात राज्या मधून वधू-वरांनी नोंदणी केलेली असून संपूर्ण राज्यभरातून जवळ - जवळ सात ते आठ हजार समाजसेवक बंधू-भगिनी या मेळाव्यासाठी उपस्थित राहतील अशी माहिती मंडळाचे सचिव रवींद्र जयराम चौधरी यांनी दिली.या मेळाव्यामध्ये चहा, नाश्ता, उसाचा रस ,जेवण, पिण्याचे पाणी ही सर्व व्यवस्था मोफत करण्यात आलेली असून यासाठी कोणत्याही प्रकारचे शुल्क आकारण्यात आलेले नाही असेही त्यांनी सांगितले .

  स्वर्गीय दत्तात्रय लालचंद महाले नगर ,पाडवी नूतन विद्यालयाचे मैदान, स्टेशन रोड, धुळे या ठिकाणी मेळाव्याचे आयोजन करण्यात आले असून या मेळाव्यासाठी महाराष्ट्र राज्याचे वैद्यकीय शिक्षण मंत्री मा. श्री गिरीश भाऊ महाजन यांचे सह माजी केंद्रीय मंत्री मा. श्री सुभाष भामरे, माजी आमदार श्री राजवर्धनजी कदमबांडे, मा.आ. शिरीषदादा चौधरी, भाजपाचे प्रदेश उपाध्यक्ष बबनरावजी चौधरी, मा. शिक्षण सभापती संदीप तात्या महाले, अक्कलकुवा येथील उद्योजक दिलीप शंकर चौधरी, मा. स्थायी समितीचे सभापती सतीश तात्या महाले, राजू नाना महाले, मा. महापौर कल्पना काकू महाले, नगरसेविका प्रतिभाताई चौधरी, महापौर प्रदीप नाना कर्पे, युवराज आबा करणकाळ,नगरसेवक नरेश आप्पा चौधरी, सुनील चौधरी नगरसेवक शिंदखेडा, रमेश उचित मालेगाव, नगरसेविका सौ.पुष्पाताई बोरसे, श्रीमती मंगलताई चौधरी, प्रदेश तेली महासंघाच्या जळगाव जिल्हाध्यक्ष सौ. निर्मलाताई चौधरी यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित राहणार असून मेळाव्याच्या यशस्वीतासाठी संपूर्ण मंडळाचे सर्व पदाधिकारी परिश्रम घेत आहेत.

   धुळे महानगरातील, जिल्ह्यातील नाव नोंदणी केलेले सर्व वधू - वर पालक व समाजसेवक बंधू-भगिनी तसेच पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी या मेळाव्यास उपस्थित राहून सहकार्य करावे व कार्यक्रमाची शोभा वाढवावी असे आवाहन मंडळाचे अध्यक्ष कैलास आधार चौधरी, सचिव रवींद्र जयराम चौधरी ,कार्याध्यक्ष मनोज मधुकर चौधरी, उपाध्यक्ष जयवंत रामदास चौधरी ,उपाध्यक्ष चंद्रकांत श्रीराम चौधरी यांनी केलेले आहे.

शेयर करा:

📺 संबंधित व्हिडिओ:

▶️
Click to load video
YouTube Thumbnail

Delhi Sahu Rathore samaj yuvak yuvati parichay sammelan & pratibha samman samaroh